सोनिया गांधी यांनी युपीएच्या काळात नेहरूंची पत्रे असलेली १५ खोकी पंतप्रधान संग्रहालयातून घेऊन गेल्या ते परत केले नाहीत. त्यामुळे संग्रहालयाचे सदस्य डॉ. रिझवान कादरी यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून नेहरूंची ती सर्व पत्रे परत संग्रहालयाला परत करावीत, अशी मागणी केली आहे. त्यातच आता ब्रिटनमधील साउथ हॅम्प्टन विद्यापीठात असलेली नेहरूंची पत्रेही भारताने मिळवावीत, या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांची मागणी चर्चेत आली आहे.
ही कागदपत्रे भारतात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत, मात्र तेथील न्यायालयाने याविषयी निर्णय दिल्याने बऱ्याच अडचणी येतील. त्याचे सर्व अधिकार ब्रिटनचे आहेत. मात्र तरीही ती कागदपत्रे भारतात आणणे गरजेचे आहे.– डॉ. रिझवान कादरी, सदस्य, पंतप्रधानांचे संग्रहालय
१९४७ ते १९६० दरम्यान एडविना माउंटबॅटन आणि जवाहरलाल नेहरू यांनी एकमेकांना अनेक पत्रे पाठवली आहेत. ती सध्या ब्रिटनमधील साउथ हॅम्प्टन विद्यापीठात आहेत. लॉर्ड माउंट बॅटन आणि लेडी माउंटबॅटन यांच्या वैयक्तिक डायरी आणि एडविना माउंटबॅटन आणि जवाहरलाल नेहरू यांची वैयक्तिक पत्रे प्रकाशित करण्याची मागणी करणारी एक याचिका ब्रिटिश लेखक अँड्र्यू लोनी यांनी तेथील न्यायालयात केली होती. मात्र न्यायालयाने त्यावर साउथ हॅम्प्टन विद्यापीठाच्या बाजूने निकाल दिला. अशा प्रकारे ही पत्रे जगजाहीर केली तर भारत आणि पाकिस्तान यांच्याशी ब्रिटनचे असलेले संबंध बिघडतील, ब्रिटनच्या राजघराणाच्या विश्वासार्हतेसाठी हे योग्य नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
त्यामुळे नेहरूंनी असे त्या पत्रात काय लिहिले आहे ज्यामुळे त्यांची आणि ब्रिटनची प्रतिमा खराब होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ब्रिटनच्या राजघराण्याची विश्वासार्हतेला धोका निर्माण होईल, म्हणून भारताच्या स्वातंत्र्याचा करार कसा झाला, यामागे कोणकोणती गुपिते दडली होती, ती सर्व या पत्रांमधून उघड होण्याची भीती ब्रिटनला आहे. मात्र तरीही ती पत्रे भारत सरकारने भारतात आणावीत, अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनीही केली आहे. या पत्राच्या माध्यमातून नेहरूंनी केलेल्या घोडचुका सर्वांच्या समोर येणार आहेत.
Join Our WhatsApp Community