के.पी. ओली यांना धक्का! बहुमत सिद्ध करण्यात अपयश! 

पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या कम्युनिस्ट पार्टीने ओली सरकारला दिलेले समर्थन काढल्याने सरकार अल्पमतात आले होते.

78

नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली हे संसदेच्या खालच्या सदनात बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरले. नेपाळ कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) या पक्षाने ओली सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतल्याने ओली सरकार अल्पमतात आले होते. त्यामुळे ओली सरकारला खालच्या सभागृहात बहुमत सिद्ध करण्याच्या परीक्षेला सामोरे जावे लागले, मात्र यात ओली सरकार अपयशी ठरले. २३२ पैकी १२४ मते त्यांच्या विरोधात पडली. त्यांना केवळ ९३ मते मिळाली. ओली यांना किमान १३६ मतांची आवश्यकता होती.

असे सरकार कोसळले! 

बहुमत सिद्ध करण्याच्या वेळी ओली सरकारला केवळ ९३ मते मिळाली, तर विरोधकांना १२४ मते मिळाली. यावेळी २३२ खासदारांनी मतदान केले. तर १५ खासदार तटस्थ राहिले. नेपाळच्या संसदेत एकूण २७१ खासदार आहेत. त्यामध्ये माधव नेपाळ आणि झालानाथ खनाल यांचा गट मतदानात सहभागी झाला नाही. २० डिसेंबर २०२० रोजी ओली यांनी अचानक संसद बरखास्त करण्याची घोषणा केल्यानंतर ओली सरकारच्या नेपाळ कम्युनिस्ट पार्टीत उभी फूट पडली. एका गटाचे नेतृत्व स्वतः के.पी. ओली करतात, तर दुसऱ्या गटाचे माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल हे करत आहेत.

(हेही वाचा : संजय राऊतांकडून अहिल्याबाई होळकरांचा अवमान! वंशज भूषणसिंह राजेंनी खडसावले! )

संसदेतील पक्षीय बलाबल 

  • एकूण जागा                             – २७१
  • कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ           – १२१
    (केपी ओली यांचा पक्ष)
  • नेपाळी काँग्रेस                          – ६३
  • नेपाळी कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)  – ४९
    (पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ चा पक्ष)
  • जनता समाजवादी पार्टी                – ३२
  • अन्य                                    – २
  • निलंबित                                – ४
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.