भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा नेरुळ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे आमदार गणेश नाईक यांची अटक अटळ बनली आहे.
राज्य महिला आयोगाकडेही तक्रार दाखल
आमदार गणेश नाईक यांनी एका महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर अपत्य झाले. पण भाजप आमदार गणेश नाईक यांनी अपत्याचा स्वीकार केला नाही. पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी या महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्याप्रकरणी आयोगाने नवी मुंबई पोलिसांना यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर पोलिसांनी गणेश नाईक यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे व इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणे हे गुन्हे दाखल केले. याप्रकरणी गणेश नाईक यांच्यावर तत्काळ अटकेची कारवाई सुरु झाली आहे. पोलीस गणेश नाईक यांचा शोध घेत आहेत. गणेश नाईक आणि आपण १९९३ पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांच्यापासून १५ वर्षांचा मुलगा आहे. पण आमदार गणेश नाईक यांनी माझ्या मुलाला स्वीकारण्यास नकार दिला. माझ्यासह माझ्या १५ वर्षीय मुलाला ठार मारण्याची धमकी गणेश नाईक यांनी दिली, असे तक्रारदार महिलेने म्हटले आहे.
(हेही वाचा मशिदींवरील ‘ते’ भोंगे आता उतरवावेच लागणार! )
Join Our WhatsApp Community