नेट-झिरोसाठी विद्यापीठातील तरुणांना कौशल्य मिळवून देणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनचा एक भाग असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री तथा खासदार प्रकाश जावडेकर यांनी केले. दिल्ली विद्यापीठाच्या विस्तीर्ण कॅम्पसमध्ये सुमारे ३० विद्यापीठे आणि ४५ महाविद्यालयांमध्ये नेट-झिरो या मोहिमेचा शुभारंभ झाला. त्यासाठी आयोजित कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठ परिसरांना कार्बन न्यूट्रल आणि नेट-झिरो करण्यासाठीची ‘U75’ या राष्ट्रीय चळवळीला यावेळी हिरवा झेंडा दाखविण्यात आला. (NetZero Movement)
U75 ही नेट-झिरो चळवळ आहे जी भारतीय स्वातंत्र्याच्या ५५ व्या वर्धापन दिनानंतर पहिल्या वर्षी सुरू झाली. “विद्यापीठ कॅम्पसमध्ये नेट-झिरो चळवळ ही केवळ टॅगलाइन नाही तर शाश्वत विकास उद्दिष्टे लागू करणे आणि पॅरिस हवामान कराराच्या वचनांची पूर्तता करणे हा राष्ट्रीय हेतू त्यामागे आहे”, असे दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. योगेश सिंग यांनी केले. विद्यार्थी व उच्च शिक्षण संस्थांमधील भागीदारी आणि संवादामध्ये हवामान बदलावरील कारवाईला गती देण्याचे सामर्थ्य आहे यावर त्यांनी भर दिला. (NetZero Movement)
ग्रीन तेर फाउंडेशनच्या पुढाकाराने ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ३५०हून अधिक आणि प्राध्यापक उपस्थित होते. विद्यापीठ तसेच महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये नेट-झिरो मोहिम सुरू करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन या कार्यशाळेत विविध तज्ज्ञांनी केले. त्यात ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि संयुक्त राष्ट्राचे माजी अंडर-सेक्रेटरी-जनरल एरिक सोल्हेम, युनेस्को निधीचे संचालक टिम कर्टिस, अखिल भारतीय उच्च तंत्रशिक्षण परिषदेच्या संचालक डॉ. ममता राणी अग्रवाल आदींचा समावेश होता. (NetZero Movement)
पश्चिम आणि दक्षिण भारतात ही मोहिम यापूर्वीच सुरू झाली आहे. त्यासाठी पुणे आणि चेन्नईत तज्ज्ञांच्या कार्यशाळा झाल्या आहेत. आता उत्तरेतील शिक्षण संस्थांसाठी दिल्लीत कार्यशाळा घेण्यात आली. नेट-झिरो या मोहिमेद्वारे विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये पर्यावरणपूरक बाबींची रेलचेल असणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाप्रती विशेष जनजागृती केली जाणार आहे. ग्रीन तेर फाऊंडेशनचे संस्थापक संचालक आणि युनेपचे माजी संचालक डॉ. राजेंद्र शेंडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, विद्यापीठांचे महत्त्व केवळ संशोधन करण्यापुरते मर्यादित रहायला नको. विद्यार्थी आणि समाजातील बदलासाठी उत्प्रेरक म्हणून काम करायला हवे. त्यासाठी त्यांनी सीमा ओलांडल्या पाहिजेत यावर भर दिला. (NetZero Movement)
युनेस्को, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP), ऊर्जा मंत्रालय, ASSOCHAM मधील तज्ज्ञांनी नेट-झिरो कॅम्पससाठीचा कृती आराखडा विकसित करण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. ग्रीन तेर फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यापीठासह उच्च शिक्षण संस्थांना विविध माहिती उपलब्ध करुन देईल. तसेच, बेसलाइन उत्सर्जन मोजणे, नेट झिरो कॅम्पससाठी रोडमॅप तयार करणे, प्रदूषण रोखणे अशा विविध पातळ्यांवर प्रत्यक्ष सहकार्य करेल. (NetZero Movement)
(हेही वाचा – Air Tickets Refund : कोरोना काळातील रद्द विमान तिकीटांचा परतावा मिळणार)
ग्रीन तेर फाऊंडेशनविषयी
ग्रीन तेर फाउंडेशन ही पुणेस्थित संस्था आहे. विशेषतः हवामान बदल, जागतिक तपमान वाढ, जैवविविधता, आरोग्य आणि असमानता यावर तरुण आणि समुदायांद्वारे कृती करण्यासाठी एक जागतिक आणि स्थानिक मंच संस्थेद्वारे उपलब्ध करुन देण्यात आला आहे. स्मार्ट कॅम्पस क्लाउड नेटवर्क (SCCN) हा ग्रीन तेर फाउंडेशनचा प्रमुख प्रकल्प आहे. SCCN हे विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांचे (HEI) जागतिक नेटवर्क आहे जे शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) पूर्ण करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करते. हे नेटवर्क विद्यापीठांमधील तरुणांना त्यांच्या स्वत:च्या कॅम्पसमध्ये SDG आणि हवामान बदलाशी संबंधित प्रकल्प हाती घेण्यास प्रोत्साहित करते. (NetZero Movement)
दिल्ली विद्यापीठ हे सर्वोच्च शैक्षणिक दर्जा, विविध शैक्षणिक कार्यक्रम, प्रतिष्ठित प्राध्यापक, नामवंत माजी विद्यार्थी, विविध सह-अभ्यासक्रम उपक्रम आणि आधुनिक पायाभूत सुविधांसाठी आदरणीय वारसा आणि आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले देशातील प्रमुख विद्यापीठ आहे. विद्यापीठाने उच्च शिक्षणातील सर्वोच्च जागतिक मानके आणि सर्वोत्तम पद्धती कायम ठेवल्या आहेत. (NetZero Movement)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community