नेताजी सुभासचंद्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी कधीच तडजोड केली नाही. नेताजी असते तर देशाची फाळणी झाली नसती, असे प्रतिपादन देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एनएसए अजित डोवाल यांनी शनिवार, १७ जून रोजी आयोजित नेताजी सुभासचंद्र बोस स्मारक कार्यक्रमात बोलत असताना केले.
नेताजींनी स्वातंत्र्याची भीक न मागता इंग्रजांशी समर्थपणे लढा दिला. नेताजींच्या महान प्रयत्नांवर कोणीही शंका घेऊ शकत नाही, मोहनदास गांधीही त्यांचे प्रशंसक होते. परंतू अनेकदा लोक तुमच्या निकालांवरुन तुमचा न्याय करतात. त्यामुळे सुभाषचंद्र बोस यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले असते, असे कोणीही म्हणू नये. इतिहासाने त्यांच्यासोबत अन्याय केला, पण आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा दैदिप्यमान इतिहास पुन्हा मांडत असल्याचेही एनएसए अजित डोवाल म्हणाले.
नेताजींनी आपल्या आयुष्यात अनेकदा धैर्य दाखवले आणि मोहनदास गांधींना आव्हान देण्याचे धाडसही त्यांच्यात होते. मोहनदास गांधीजी राजकारणाच्या शिखरावर असताना नेताजींनी काँग्रेस सोडली होती. देशातील लोकांची राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक मानसिकता बदलण्याची गरजही नेताजींनी व्यक्त केली होती, असेही एनएसए अजित डोवाल यांनी बोलताना नमूद केले.
Join Our WhatsApp Community