नेताजींच्या नातवाच्या डोक्यात केमिकल लोच्या! मुघल-नाझींबद्दल प्रेमाचा उमाळा, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राजपूतांचा द्वेष

सध्या चंद्र कुमार बोस हे प.बंगालमध्ये राजकारणातील 'ममता' दाखवताना आपला इतिहास विसरले आहेत.

116

मुघलांनी ताजमहाल आणि लाल किल्ला बांधला. कोणाशीही न लढता राजपूतांचा पराभव झाला. हिटलर महान देशभक्त होता आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांसह क्रांतिकारकांचे संग्रहालय न केलेले बरे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा नातू चंद्र कुमार बोस यांचे हे विचार आहेत. हे विचार ऐकून देश हादरला असून नेताजींच्या नातवाच्या मेंदूमध्ये केमिकल लोच्या झाला आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आझाद हिंद फौजेचे संस्थापक रासबिहारी बोस यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांशी चांगले संबंध होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सल्ला दिल्यावर रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद फौजेची धुरा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे सोपवली. जेव्हा नेताजींना सशस्त्र क्रांतीसाठी लढवय्य्यांची गरज होती, त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेने सैनिकी शिक्षणासाठी हजारो तरुण उपलब्ध झाले होते. त्याच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा नातू चंद्र कुमार बोस यांना आता मुघलांचे वंशज, नाझींची हुकूमशाही आणि त्यांनी केलेले अत्याचार हे चांगले वाटू लागले आहेत. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या समर्थनार्थ लिहिले आहे. असे समजते की, सध्या चंद्र कुमार बोस हे राजकारणातील ‘ममता’ दाखवताना आपला इतिहास विसरले आहेत.

(हेही वाचा क्रांतियुद्धाच्या मंदिराचा वीर सावरकरांनी रचला पाया, सुभाषचंद्र बोसांनी कळस ठेवला – रणजित सावरकर)

चंद्र कुमार बोस यांचे ट्विट आणि त्यावर उत्तर

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे संबंध आणि त्यांनी केलेल्या क्रांतिकार्याचा चंद्र कुमार बोस अपमान करत आहेत. ज्यांचे संबंध आणि क्रांतिकारक कार्यांबद्दल इतिहासात अनेक उल्लेख आहेत. ट्विटद्वारे ते हा द्वेष प्रकट करत आहेत.

netaji

बाप कोण?

कृष्ण कुमार नावाच्या ट्विटर युजरने चंद्र कुमार बोस यांना संतप्त उत्तर दिले आहे. ज्या सुभाषचंद्र बोस यांनी 1940 मध्ये वीर सावरकर यांच्या निवासस्थानी जाऊन परदेशी भूमीतून ब्रिटिशांविरुद्ध आघाडी उघडण्याविषयी रणनीती ठरवली. त्यांच्या घरातील वंशज वीर सावरकर यांच्यावर टीका करू शकत नाही. त्यांनी त्यांच्या आईला विचारावे त्यांचा खरा बाप कोण आहे?

6 tweet

सरोज बैद यांनी लिहिले आहे की, वीर सावरकर हे बोस घराण्यापेक्षा जास्त देशभक्त होते. सावरकरांच्या मदतीनेच नेताजी नजरकैदेतून बाहेर आले. लाज वाटली.

चंद्र कुमार बोस हे भारताचे राजपूत न राहता मुघल नायक वाटतात. ते लिहितात, मुघल राजवटीच्या धड्यांशिवाय भारताचा इतिहास अपूर्ण असेल. ज्याने ताजमहाल, लाल किल्ला, आग्रा किल्ला, फतेहपूर सिक्री… राजपूत कोणाशीही लढले नाहीत आणि पराभूत झाले. आपल्या महान देशातील तरुणांना खरा इतिहास जाणून घेण्याचा अधिकार आहे.

3 tweet

चंद्र कुमार बोस नाझींचे समर्थन करतात, त्यांना हिटलर आवडतो, त्यांच्या ट्विटमध्ये लिहितो, हिटलर हा राष्ट्रवादी होता ज्याला युरोप जिंकायचा होता.

5 tweet

तरुणांनी चोख प्रत्युत्तर दिले

अपर्णा रावल यांनी तिच्या फेसबुक अकाउंटवर चंद्र कुमार बोस यांना उत्तर दिले आहे. तुम्हाला आमच्या राजपूत इतिहासाबद्दल काहीच माहिती नाही असे दिसते, भारतीय इतिहास किंवा मानवी भावनांचा विषयच सोडा. भ्रामक कथेचे समर्थन करण्यासाठी तुम्ही राजपूत इतिहास सोयीस्करपणे फेटाळून लावला आहे, वीर सावरकरांनाही लक्ष्य करण्यात तुम्हाला अजिबात संकोच वाटला नाही, विशेषत: जेव्हा हीच संस्था तुमचे काका सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ मुंबईत कार्यक्रम आयोजित करत आहे.

गंगा नावाच्या ट्विटर युजरने लिहिले आहे की, आमच्या समाजाबाबत तोंड उघडण्यापूर्वी तुम्ही बंगालचे महान सुपुत्र सर जदुनाथ सरकार यांनी लिहिलेला राजपूतांचा इतिहास का वाचत नाही.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.