MLA Jitendra Awhad यांना नेटकऱ्यांचा सवाल; ‘विकली जाणारी गाढवे पाळायचीच कशाला?’

220
नेटकऱ्यांनी काढली Jitendra Awhad यांची अब्रू

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी X वर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीने आमदारांना मतदानासाठी ५ कोटी तसेच १०० कोटींचा विकास निधी अशी ऑफर दिली, त्या आमिषाला महाविकास आघाडीचे आमदार बळी पडले, असा आरोप केला. त्यावर नेटकऱ्यांनी आव्हाड यांचेच कपडे काढले. एकाने तर ‘विकली जाणारी गाढवे पाळायचीच कशाला? असा सवाल करत ‘देवेंद्रजीनी तिसऱ्या वेळी सिद्ध केलं, हा खेळ काकांना येत नाही,’ असा टोलाही हाणला. (MLA Jitendra Awhad)

आव्हाडांची पोस्ट

मुंब्रा मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी X वर पोस्ट केली की, “विधान परिषदेच्या निवडणुकीत जी काही मते फुटली किंवा फोडण्यात आली, त्याचे एकमेव कारण म्हणजे पैसा आणि विकासनिधी. म्हणजे जनतेच्याच पैशाचा खेळ! विकासनिधी हा कुणी स्वतःच्या घरातून आणत नाही. जनतेच्या करातून सरकारी तिजोरीत जमा झालेला पैसा हा विकासनिधी म्हणून वापरला जातो. पण, या सरकारने तेही जमविले नाही. या सरकारने फक्त कर्जाचा डोंगर उभा केला अन् त्या कर्जाच्या डोंगरातूनच हे पैसे काढले जात आहेत. म्हणजेच, जनतेच्याच खिशाला कात्री लावण्याचे काम केले जातेय.” (MLA Jitendra Awhad)

आमिषाला बळी पडले

“पाच कोटी रूपये आणि शंभर कोटी रूपयांची कामे, अशी ऑफर प्रत्येक आमदाराला दिली जात होती. काही पैशांच्या अमिषाला बळी पडले. स्वतःच्या राजकीय अस्तित्वाविषयी काळजी नाही; स्वतःच्या राजकारणाविषयी पुढे जाण्याची इच्छा नसेल तर त्याला कोण काय करणार? आजचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. यानंतर पुढे विधानसभा निवडणुकांना सामोरे जायचे आहे. पण, जे आमदार फुटले आहेत; त्यांची नावे आज रात्री किंवा उद्या बाहेर पडणारच आहेत. त्यामुळे आपला आमदार पैसे घेऊन फुटला आणि पक्षाशी गद्दारी केली, हे पुन्हा एकदा जाहीर होईल. या गद्दारीविरोधात प्रचंड संताप जनतेच्या मनात आहे. गद्दारी करणाऱ्यांविरुद्ध तसेच गद्दारी करायला लावणार्‍यांविरोधातही जनतेच्या मनात रोष आहे,” असेही त्यांनी लिहिले आहे. (MLA Jitendra Awhad)

(हेही वाचा – CM Eknath Shinde: मुंबईत आलेल्या पंतप्रधानांचे मुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुक; म्हणाले, मोदींच्या कामात प्रभू राम आणि…)

जनतेला घेऊ शकत नाहीत विकत

ते पुढे म्हणतात, “पाच कोटी रूपये आणि १०० कोटींची विकासकामे हा दर ठरला होता. तुम्ही हे देऊन आमदारांना विकत घेऊ शकता; पण, जनतेला घेऊ शकत नाहीत. तुम्ही आमदारांना विकत घेताना खूप पैसे वाटले आहेत. आमदारांना विकत घेताना खूप, अगदी हजार कोटी रूपयांचा विकासनिधी दिलात. पण, तुम्हाला कुठेच यश मिळू शकले नाही. म्हणून तुम्ही १७ वरच अडकले. तेव्हा जनतेला विकत घेऊ शकतो, या भ्रमात राहून आम्ही विधान परिषद जिंकली आता विधानसभा जिंकू, हे विसरून जा. जनतेच्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड राग आहे. आजनंतर अधिक राग निर्माण होईल की अजून तुमच्या घाणेरड्या सवयी गेलेल्या नाहीत.” (MLA Jitendra Awhad)

पक्षाचे संस्कार तसलेच आहेत?

या आव्हाड यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी त्यांनाच जाब विचारला. “थोडक्यात मावा आघाडी आमदार विकाऊ आहेत. पक्षाचे संस्कार तसलेच आहेत का?” असा पहिलाच रिप्लाय त्यांना मिळाला. पुढे एकाने, “थोडक्यात काय तर तुमचे आमदार विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर खरेदी करणारेसुद्धा आहेत. जे विक्रीला उपलब्ध आहेत त्यांनी तमाशाचा फड काढून अंबानीच्या मुलाच्या लग्न कार्यक्रमात फड गाजवून पैसे कमवायचे असते,” असा टोला ठाकरे कुटुंबालाही लगावला. तर एकाने, “यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है जितूद्दीन,” अशा शब्दांत उतरवली. (MLA Jitendra Awhad)

अन्य काही बोलक्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे :

-“म्हणजे हलकट आमदारांनी जागोजागी बेईमानी आणि गद्दारी बेशरमपणे करत राहायची. ईमानदारी फक्त मतदारांनी दाखवुन संविधान आणि लोकशाही प्रत्येक निवडणुकीत वाचवत राहायची.”

-“काँग्रेस ही भाजपची बी टीम आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची वायझेड टीम.”

-“फडणवीस साहेब यांच्यावर शेन फेकण्या पेक्षा आधी स्वतःची बघा कुठे कुठे आणि किती भोक पडलेली आहे …..ते जरा नीट करा आणि स्वतःच्या आमदार विकल्या जाऊ नये या साठी काही तरी करा जर खरच तुम्ही १% तरी इमानदार असाल तर ..”

-“अतिरिक्त उमेदवार मविआ ने दिला, मविआ चाच उमेदवार पडला, मग जर अपेक्षित मते न्हवती तर उमेदवार उभा का करायच. आणि नवीन उभा केलेला उमेदवार जिंकला आणि पवारांनी बाहेरून सपोर्ट केलला उमेदवार पडला हे कुठेतरी काहीतरी चुकीचं वाटतं.. बाकी जनता समजूतदार आहेच..” (MLA Jitendra Awhad)

New Project 2024 07 13T203830.067

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.