कृषी कायदे आम्ही पुन्हा आणू असे कधीच म्हटले नव्हते, असे स्पष्टीकरण केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिले. यासंदर्भात सुरू झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा खुलासा केला. नागपूरमध्ये आयोजित कृषी शिखर संमेलनात बोलताना नरेंद्रसिंग तोमर यांनी ‘एक कदम पिछे हटे है, आगे फिर बढेंगे’ असे वक्तव्य केले होते. त्यामुळे सरकार कृषी कायद्यांचा पुनर्विचार करीत असल्याची चर्चा सुरू झाली. यासंदर्भात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देखील सरकारला इशारा दिला होता.
70 वर्षांनंतर शेती क्षेत्रात बदल घडवणारे कायदे
याबाबत कृषीमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की, केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे चांगले होते. मात्र, काही कारणांमुळे ते रद्द करण्यात आले. भारत सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करेल. आम्ही पुन्हा कायदा आणू, असे मी म्हटले नव्हते, असे स्पष्टीकरण तोमर यांनी दिले आहे. मोदी सरकारने 70 वर्षानंतर शेती क्षेत्रात बदल घडवणारे कायदे केले होते. मात्र, काही जणांना या सुधारणा योग्य वाटल्या नाहीत, असे म्हणत तोमर यांनी नागपुरातील कार्यक्रमात विरोधकांना टोला लगावला होता. शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. शेतकरी मजबूत राहीला तर देश मजबूत होणार असल्याचे तोमर म्हणाले. कोरोनाच्या क्षेत्राचा सर्व क्षेत्राला फटका बसला, मात्र, कृषी अर्थव्यवस्था या प्रतिकूल परिस्थितीतही मजबूत स्थितीत राहिल्याचे तोमर म्हणाले होते.
(हेही वाचा विधानसभा अध्यक्षांच्या निवडीत राज्यपालांचा हस्तक्षेप?)
Join Our WhatsApp Community