राजधानीत कडाक्याची थंडी पडत असताना दुसरीकडे निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपा, आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा कडाक्याच्या थंडीत देखील जोरदार प्रचार सुरु आहे. यामुळे दिल्ली मध्ये राजकीय वातावरण उमेदवाराच्या प्रचारामुळे रंजक झाले आहे. नवीन मतदारांना आकर्षित करण्यातसोबतच व्यस्क मतदारांना देखील वेगवेगळी आश्वासनं देण्यात आली आहे. खासकरून महिलांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये चढाओढ बघायला मिळत आहे.
सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरले असून प्रचार जोरात सुरु आहे.नवी दिल्ली विधानसभा (New Delhi Assembly Election) जागेसाठी २९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. महत्वाचे म्हणजे या हॉट सीट वर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भाजपाचे प्रवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित हे येथून उमेदवार आहेत. नवी दिल्ली मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तर कस्तुरबा नगरमध्ये सर्वात कमी उमेदवार आहेत. दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीसाठी (New Delhi Assembly Election) एकूण ९८१ उमेदवारांनी १५२१ अर्ज भरले आहेत.
(हेही वाचा – Ladki Bahin Yojana: शेकडो बहिणींनी अर्ज घेतले मागे, आदिती तटकरे यांच्याकडून मोठा खुलासा)
२०२५ च्या विधानसभा निवडणुकीसाठी (New Delhi Assembly Election) नामांकन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यावेळी एकूण ९८१ उमेदवारांनी १५२१ नामांकन अर्ज दाखल केले आहेत. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक गर्दी आहे, जिथे २९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सुरुवातीपासूनच ही जागा हाय-प्रोफाइल राहिली आहे आणि यावेळीही ती चर्चेचा केंद्रबिंदू राहिली आहे. दुसरीकडे, कस्तुरबा नगर मतदारसंघासाठी सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. येथे आपकडून रमेश पहेलवान, भाजपाकडून नीरज बसोया आणि काँग्रेसकडून अभिषेक दत्त (Abhishek Dutt) निवडणूक रिंगणात आहेत. या जागेवरील स्पर्धाही कठीण असेल. विविध जागांवर मोठ्या संख्येने उमेदवार आहेत. त्यामुळे निवडणुक आणखी रंजक होण्याची शक्यता आहे. कालकाजी मतदारसंघासाठी १८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या जागेवरून आपकडून दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी, भाजपाकडून रमेश बिधुरी आणि काँग्रेसकडून अलका लांबा उमेदवार आहेत.
त्याच वेळी, बल्लीमारन जागेसाठी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आपचे कॅबिनेट मंत्री इम्रान हुसेन, काँग्रेसचे हारुन युसूफ आणि भाजपचे कमाल बागडी हे येथून उमेदवार आहेत. ग्रेटर कैलास जागेसाठी १० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या जागेवरून आपकडून कॅबिनेट मंत्री सौरभ भारद्वाज, भाजपाकडून शिखा राय आणि काँग्रेसकडून गरवीत सिंघवी निवडणूक रिंगणात आहेत.
(हेही वाचा – तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करीत मानवी जीवन सुसह्य करणे शक्य – CM Devendra Fadnavis)
माजी उपमुख्यमंत्री जंगपुरा येथून १२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आपचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, भाजपाचे तरविंदर सिंग मारवाह आणि काँग्रेसचे फरहाद सुरी हे येथून उमेदवार आहेत. बाबरपूर मतदारसंघासाठी १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. येथून आपचे कॅबिनेट मंत्री गोपाल राय, भाजपाचे अनिल वशिष्ठ आणि काँग्रेसचे हाजी मोहम्मद इशरक खान रिंगणात आहेत. सुलतानपूर मजरा मतदारसंघासाठी १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या जागेवरून आपकडून कॅबिनेट मंत्री मुकेश अहलावत, काँग्रेसकडून जय किशन आणि भाजपाकडून करम सिंह कर्मा हे उमेदवार आहेत.
शकूर बस्ती मतदारसंघात ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आपचे माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन, भाजपचे कर्णैल सिंह आणि काँग्रेसचे सतीश लाथुरा हे येथून उमेदवार आहेत. पटपरगंज मतदारसंघातही ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. येथून आपचे अवध ओझा, भाजपाचे रविंदर सिंग नेगी आणि काँग्रेसचे अनिल चौधरी रिंगणात आहेत. या नामांकन पत्रांवरून हे स्पष्ट होते की दिल्लीतील विधानसभा निवडणुकीदरम्यान (New Delhi Assembly Election) विविध जागांवर चुरशीची लढत होणार आहे, ज्यामुळे येत्या काळात निवडणुकीचे वातावरण आणखी तापेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community