दिल्लीतील RSS च्या नवीन मुख्यालयात 19 फेब्रुवारीपासून कामकाजाला सुरुवात

आरएसएस कार्यालय: तीन इमारती, 300 खोल्या, 150 कोटी रुपयांची किंमत

304
दिल्लीतील RSS च्या नवीन मुख्यालयात 19 फेब्रुवारीपासून कामकाजाला सुरुवात
दिल्लीतील RSS च्या नवीन मुख्यालयात 19 फेब्रुवारीपासून कामकाजाला सुरुवात

दिल्ली (Delhi) मधील झंडेवालान येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (Rashtriya Swayamsevak Sangh head quarter) भव्य इमारत ‘केशवकुंज’, (KeshavKunj) ही आधुनिक इमारत सर्व सुविधायुक्त उभारण्यात आली आहे. सर्व आधुनिक सुविधा युक्त ही इमारत असून 19 फेब्रुवारी पासून येथून कामकाज सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. 19 फेब्रुवारीला कार्यकर्ता परिषदेचे आयोजन (Organization of Worker Council) करण्यात आले आहे. (RSS)

(हेही वाचा – Delhi Assembly Election 2025: रामलीला मैदानात दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री घेणार शपथ )

दिल्लीत बांधलेली आरएसएस आधुनिक इमारती मध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत (RSS chief Mohan Bhagwat) आणि सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे 19 फेब्रुवारीपासून या कार्यालयातून आपले काम सुरू करतील. ‘केशवकुंज’ नावाची ही भव्य इमारत गुजरातचे आर्किटेक्ट अनुप दवे (Architect Anup Dave) यांनी डिझाइन केली आहे.

जेथे आरएसएसने आपले दिल्लीतील कार्यालय हलविले आहे. या पुनर्रचना प्रकल्पात 3.75 एकर क्षेत्रात तीन  इमारती मध्ये 13 मजले आहेत, ज्यात सुमारे 300 खोल्या आणि कार्यालये असतील. या इमारतींचे नाव साधना आणि अर्चना आहे. ही नवीन इमारत पहिल्या  इमारतीपेक्षा अगदी वेगळी आहे. यात आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपारिक आर्किटेक्चरचे संयोजन आहे, जे हवेशीर आणि सूर्यप्रकाशाने समृद्ध आहे. हे गुजरात आर्किटेक्ट अनूप दवे यांनी डिझाइन केले आहे. यात तीन टॉवर्स आहेत.

(हेही वाचा – Taxi करता इकोसोबत सीएनजीच्या इर्टिगा आणि बोलेरो या गाड्यांनाही परवानगी देण्याची मागणी )

ऑफिसच्या आवारात काय असणार ? 

नवीन इमारतीत राम मंदिर चळवळीशी संबंधित विश्व हिंदू परिषदचे नेते अशोक सिंघल यांच्या नावावर एक प्रमुख सभागृह आहे. या व्यतिरिक्त या कॅम्पसमध्ये लायब्ररी, हेल्थ क्लिनिक आणि सांडपाणी उपचार प्रकल्प यासारख्या सुविधा आहेत. येथे सौर ऊर्जा देखील वापरली जात आहे. यासह, पांचजन्य आणि आरएसएसशी संबंधित साप्ताहिक मासिका व्यतिरिक्त, सुरुची प्रकाशनचे कार्यालयही या कॅम्पसमध्ये असेल.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.