विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीची चुरस शिगेला गेली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानपरिषदेच्या निकालानंतरच राज्यात सत्तांतर झाले होते. आता पुन्हा दोन वर्षानंतर विधानपरिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. पुन्हा हॉटेल वारी होत आहे. या निवडणुकीत कोणाची मते फुटतात यावरून पुढील विधानसभेचे नवी राजकीय समीकरणे उदयास येऊ शकतात. (Vidhan Parishad Election)
आता विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर असताना होत असलेल्या राज्य विधानपरिषदेच्या निवडणुकीला कमालीचे महत्त्व आले आहे. नव्या राजकीय जोडण्या व नवी राजकीय समीकरणे आकाराला येण्याची चर्चा सुरू असली तरी विधानपरिषदेच्या निकालानंतरच त्याला वेग येणार आहे. तसेच पुढची राजकीय दिशाही यातूनच ठरणार आहे. (Vidhan Parishad Election)
(हेही वाचा – Ashadhi Wari 2024: ‘हरिनामाचा गजर’ करत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोलापुरात दाखल)
यावेळेस विधानपरिषदेच्या निवडणूकीत ११ जागांसाठी १२ उमेदवार असल्याने निवडून कोण येणार यापेक्षा कोणाचा उमेदवार पडणार यावर चर्चा घडताना दिसून येत आहेत. या निवडणुकीत छोटे पक्ष तसेच अपक्षांना महत्त्व प्राप्त झाले आहे. ते कोणत्या बाजूला झुकतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये छोटे पक्ष येऊन तिसरी आघाडी देखील उदयास येऊ शकते. त्यामुळे याचा फटका महायुतीला होतो की महाविकास आघाडीला हे तर विधानसभेच्या निकालातच कळून शकेल. (Vidhan Parishad Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community