आशिष शेलारांवर भाजपने सोपवली ही मोठी जबाबदारी; मुंबईची धुरा कुणाकडे?

133

महत्वाच्या मुंबई महानगरपालिकांची जबाबदारी भाजपने ज्या आशिष शेलारांकडे सोपवली होती. आता त्यांच्याकडेच नवी जबाबदारी टाकण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्यावर आता गुजरात विधानसभा निवडणुकीत सुरतची जबाबदारी सोपणविण्यात आली आहे. त्यामुळे सुरतमधील १० विधानसभा मतदार संघांची जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे. या पार्श्वभूमीवर शेलारांच्या टीममधील काही सहकारी उद्या, मंगळवारी सुरतला रवाना होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता मुंबईची धुरा कुणाकडे असणार याबाबत चर्चा रंगण्यास सुरूवात झाली आहे.

(हेही वाचा – भाडेवाढीसाठी टॅक्सी संघटना आक्रमक; ‘या’ तारखेपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा)

दरम्यान, शेलार जर गुजरातला जाणार असतील तर भाजप मुंबई महापालिका निवडणूक कोणाच्या नेतृत्वात लढवणार असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. गेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत आशिष शेलार आणि त्यांच्या टीमने सुरतमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे यंदाही शेलार यांच्या खांद्यावर आणि त्यांच्या टीमवर्कवर भाजपच्या केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवून ही जबाबदारी सोपवली आहे. आशिष शेलार आणि त्यांचे काही सहकारी हे पुढचे काही महिने सुरतमध्ये व्यस्त राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, आता शेलार यांच्याकडे गुजरात विधानसभा निवडणुकांची जबाबदारी दिल्याने मुंबई महापालिका निवडणुका पुढच्या वर्षी होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढच्या वर्षीच्या सुरूवातीला पार पडतील, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.