जगातील सर्वात तरुण, न्यूझीलंडच्या (New Zealand) पंतप्रधान जसिंडा अर्डर्न (Jacinda Ardern) यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची मोठी घोषणा केली आहे. जसिंडा या येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये राजीनामा देणार आहेत. तसेच आगामी १४ ऑक्टोबरच्या सार्वत्रिक निवडणुक लढणार असल्याचे जसिंडा यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय आगामी निवडणुकीत न्यूझीलंडची लेबर पार्टी जिंकेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
माहितीनुसार, पंतप्रधान जसिंडा अर्डर्न यांनी पक्षाच्या वार्षिक बैठकीदरम्यान राजीनामा देण्याची घोषणा केली. यामुळे न्यूझीलंडचे राजकीय क्षेत्र ढवळून निघाले असून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. जसिंडा अर्डर्न म्हणाल्या की, ‘मी पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार आहे. आता या पदावर राहून जबाबदारी पार पाडण्याची शक्ती राहिली नाही. आता वेळ आली आहे. मी हे पद सोडत आहे, कारण विशेषाधिकाराच्या भूमिकेसोबत जबाबदारी येते. नेतृत्व करण्यासाठी तुम्ही योग्य व्यक्ती कधी आहात आणि कधी नाही हे जाणून घेण्याची जबाबदारी आहे. ही भूमिका घेण्यासाठी काय करावे लागेल, हे मला माहित आहे. आता पंतप्रधान या भूमिकेला न्याय देण्यासाठी माझ्याकडे शक्ती नाही, त्यामुळे मी लवकरच राजीनामा देणार आहे.’
दरम्यान ७ फेब्रुवारीला जसिंडा अर्डर्न यांचा कार्यकाळ संपत आहे. पण त्यापूर्वीचे अर्डर्न यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. अर्डर्न यांनी कठीण परिस्थितीत देशाचे चांगले नेतृत्व केले. कोरोना काळादरम्यान त्यांच्या नेतृत्वाचे कौतुकही झाले होते.
(हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास ‘मराठी’त ट्विट, काय म्हणाले मोदी?)
Join Our WhatsApp Community