मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यावरुन केलेल्या वक्तव्यानंतर, तसेच हनुमान जयंतीला पुण्यात केलेल्या महाआरतीनंतर आता 1 मे ला संभाजी नगर येथे होणा-या सभेत राज ठाकरे कोणती नवीन घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या या सभेपूर्वी राज्यातील वातावरण तापले आहे. तसेच, राज्य सरकारने औरंगाबादमध्ये मंगळवारपासून जमाबंदीचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता मनसेची सभा होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पण मनसेने मात्र या सभेची जय्यत तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेकडून या सभेचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे.
मनसे सभा घेण्यावर ठाम
या टिझरमध्ये राज ठाकरे यांनी चलो संभाजीनगर असा नारा दिला आहे. टीझरमध्ये राज ठाकरे यांच्या भाषणामधील मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे ही ओळ आवर्जून वापरण्यात आली आहे. गुढीपाडवा मेळाव्याला झालेल्या सभेपासून मनसे प्रखर हिंदुत्व घेऊन समोर आले आहे. त्यामुळे आता होणा-या सभेला अनेक संघटनांनी विरोध केला आहे. पोलिसांनी राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली नसली, तरी मनसे पदाधिका-यांनी स्टेज उभारण्याची तयारी केली आहे. सभेसाठी पोलिसांनी बाळगलेल्या मौनामुळे सभेबाबत अजूनही सस्पेन्स आहे. दुसरीकडे मात्र मनसे पदाधिकारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा घेण्यावर ठाम आहेत.
मनसे संभाजीनगरचे जबरदस्त टिझर
दिनांक: १ मे रविवार
स्थळ-मराठवाडा सांस्कृतिक मंडळ
वेळ-सायंकाळी ५:३० वाजता@RajThackeray@mnsadhikrut@anilshidore @rajupatilmanase @SandeepDadarMNS @GajananKaleMNS @aajtak @ABPNews @indiatvnews @ZeeNews pic.twitter.com/vwmjP5glqJ— Sumit Khambekar (@KhambekarSumit) April 26, 2022
( हेही वाचा: राज ठाकरेंच्या सभेवर प्रश्नचिन्ह? औरंगाबादेत १३ दिवस जमावबंदी )