चीनकडून पैसा घेऊन राष्ट्रविरोधी कृत्य केल्याच्या आरोपाखाली NewsClick या वेबसाईटच्या कार्यालयासह या वेब साईटच्या पत्रकारांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली. त्यानंतर मंगळवार, ३ ऑक्टोबर रोजी वेब साईटचे मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर हेड अमित चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली आहे.
३० ठिकाणांवर चौकशीसाठी छापेमारी
दिल्ली पोलिसांचे पथक सकाळपासून जवळपास ३० ठिकाणांवर चौकशीसाठी छापेमारी करत होते. त्यावेळी NewsClick च्या ८ ते ९ पत्रकारांची चौकशी केली. त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल ताब्यात घेतले. काहींना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले होते. काहींच्या घरीच चौकशी करण्यात आली. अभिसार शर्मा, प्रबीर पूरकायस्थ, भाषा सिंह, उर्मिलेश, सोहेल हाश्मी आहे पत्रकार होते. चीनकडून होणार फंडिंगबाबत आणि त्यातून काही देशविघातक कृत्य केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी न्यूज क्लिकचे कार्यालयही बंद केले आहे. 5 ऑगस्ट 2023 रोजी न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्रात एक बातमी प्रकाशित झाली होती. यामध्ये नेविली रॉय सिंघम हा अमेरिकन नागरिक चीनसाठी काम करत असल्याचा आणि देशातील संस्थांना पैसे पुरवत असल्याचा दावा करण्यात आला होता.
Join Our WhatsApp Community