उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करणार करणार अशी आता पर्यंत तीन वेळा घोषणा झाली होती. पण तिन्ही वेळेस दौरा मात्र झालाच नाही. त्यामुळे आता तरी हा दौरा होईल की नाही यावर साशंकता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जानेवारी महिन्यात महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. अर्थात अशी बातमी येण्याची ही किमान तिसरी वेळ आहे. या आधी दोनदा उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) महाराष्ट्रव्यापी दौऱ्याच्या बातम्या आल्या, पण प्रत्यक्षात दौरे झालेच नाहीत. त्याऐवजी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा अर्धा दौरा झाला आणि त्यानंतर अधून मधून संजय राऊत (Sanjay Raut) आणि सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचा दौरा होतो. पण शिवसेना फुटल्यानंतर, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झाल्यानंतर गेल्या १६ महिन्यांमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) घोषणा करूनही घराबाहेर पडून महाराष्ट्रात फिरल्याचे दिसले नाही. (Uddhav Thackeray)
पण आता २०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) ठाकरे गटाने लोकसभेसाठी संघटनात्मक बांधणीवर भर देत विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. संघटनात्मक बांधणीसाठी ठाकरे गटाची नवी रचना करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकले आहे. ठाकरे गट अँक्शन मोडवर आला आहे. पण त्याचा किती फायदा पक्षाला होईल हे तर येणारा कालच सांगेल. (Uddhav Thackeray)
(हेही वाचा – Zomato 1.6 Crore Offer : झोमॅटो कंपनीने एका तरुणाला दिली १.६ कोटी रुपये पगाराची ऑफर)
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या १० नेत्यांवर राज्यातील विभागवार संघटनात्मक तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने विशेष जबाबदारी सोपवली आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सर्वात आधी नेते मंडळात वाढ करून नेत्यांची संख्या वाढवली होती. आता या नेत्यांवर विभागवार बांधणीची जबाबदारी टाकून निवडणुकांच्या तयारीसाठी ठाकरे गटाने पुढचे पाऊल टाकले आहे. (Uddhav Thackeray)
उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम आणि पूर्व विदर्भाची जबाबदारी १० नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महाराष्ट्र दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दौरा आणि जाहीर सभांचे नियोजन सुद्धा लवकर जाहीर केले जाणार आहे. आत्तापर्यंत जाहीर झालेल्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्यांचे नेमके काय झाले?, याची खबरबात कोणाला लागलेली नाही. (Uddhav Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community