राजकारणामध्ये दूरदृष्टी अत्यंत महत्वाची असते. क्षणिक सुखाचा आनंद घेणार्यांनी राजकारण करुच नये. सत्ता मिळवल्यानंतर टिकवलीसुद्धा पाहिजे. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले परंतु त्यांना शरद पवारांचा टेकू होता. ही रणनिती पवारांची होती. उद्धव ठाकरे फक्त प्यादे होते. केवळ आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं आहे या एका महत्वाकांक्षेपोटी त्यांनी आपला पक्ष जवळजवळ संपवला.
( हेही वाचा : २२ सप्टेंबरपासून या सहकारी बॅंकेला लागणार टाळं, RBI ची कारवाई)
शिवसेनेच्या नेत्यांनी मनसेला उद्देशून बर्याचदा भाष्य केलं आहे की मनसे हा संपलेला पक्ष आहे. आज त्यांची तिच अवस्था झाली आहे. त्यात शरद पवार अगदी शांत बसले आहेत. राज ठाकरेंनी देखील शरद पवारांच्या नादी लागण्याचा प्रयत्न केला होता. तरी त्यांनी आपला सबंध पक्ष त्यांना अर्पण केला नाही. आता मात्र राज ठाकरे सावध भूमिका घेत आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत हे स्पष्ट केलं आहे की मनसे स्वतंत्र लढणार आहे.
महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पतनानंतर ते आणखी सावध झाले असावेत. राज ठाकरेंचं वैशिष्ट्य असं आहे की बाळासाहेबांसारखा दिलदारपणा त्यांच्याकडे आहे. त्यांनी भाजपवर कितीही टिका केली तरी भाजपचे नेते त्यांना भेटायला गेले, याचं कारण म्हणजे राजकारण आणि मैत्री या दोन वेगळ्या गोष्टी असतात याचं भान ठाकरेंना आहे. म्हणूनच ते एकटे पडले नाहीत आणि त्यांना असंगाशी संग करण्याची गरज पडली नाही.
उद्धव ठाकरेंच्या महात्वाकांक्षेने बाळासाहेबांचं साम्राज्य उद्धवस्थ केलं. राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे वारसा हा विचारांचो असतो, हे जरी खरं असलं तरी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं साम्राज्य पाडलं. मातोश्री किंवा शिवसेना भवनाचा दरारा आता संपला. ही चूक राज ठाकरेंनी केली नाही. आताही भाजपबरोबर युती होणार नाही हे स्पष्ट झाल्यावर त्यांनी राष्ट्रवादीची सोबत मागितली नाही. आता किती फायदा होईल यापेक्षा येणार्या १० वर्षांत मनसे पक्ष कुठे असेल, असा विचार राज ठाकरे करत आहेत.
एकनाथ शिंदेंचा वेगळा पक्ष असला तरी महाराष्ट्रात किमान पुढची १० वर्षे तरी शिंदेंच्या शिवसेनेची तत्वे भाजप पेक्षा वेगळी नसणार. हीच १० वर्षे राज ठाकरेंसाठी महत्वाची आहेत. कारण शिंदेंकडे ज्या शिवसैनिकांना जायचे नाही त्यांच्यासाठी मनसेची दारे उघडली गेली आहेत. उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आपल्याकडे वळवण्यात राज ठाकरे बाहेरुन जरी आक्रमक दिसत नसले तरी हे काम केव्हाच सुरु झालेलं आहे. याचा परिणाम देखील लवकरच दिसून येईल.
Join Our WhatsApp Community