मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना नागपूर न्यासाची ८६ कोटींची जमीन बिल्डरांना अवघ्या २ कोटी रूपयांना विकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली होती. याबाबत मोठी माहिती समोर आली असून नागपूर न्यायालयाच्या खंडपीठाने याप्रकरणाची पुढील सुनावणी ११ जानेवारी रोजी होणार असल्याचे सांगितले आहे.
(हेही वाचा – ‘पोर्नोग्राफी’वर नियंत्रण येणार! काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?)
नागपूरातील हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी नागपूरच्या न्यासाच्या भूखंड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप करत त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विरोधकांनी मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली होती.
काय दिले मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांच्या आरोपांवर उत्तर देताना म्हटले की, हा जमिनीचा सर्व व्यवहार नियमानुसार झाला आहे. न्यायालयाने या व्यवहारावर कोणतेही ताशेरे ओढले नाहीत. मी माझ्या अधिकाराचा गैरवापर केलेला नाही. भूखंड प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असे शिंदेंनी स्पष्ट केले होते.
Join Our WhatsApp Community