‘आगे आगे देखो होता है क्या!’ किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर ‘हे’ चार नेते

127

मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक आणि अनिल देशमुखांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. तर, नवाब मलिकांचा टेरर फंडींग सारख्या अपराधांसाठी NIA द्वारे तपास होणे बाकी आहे. त्यामुळे नवाब मलिक आणि अनिल देशमुख आता अनेक महिने जेलच्या बाहेर येतील असे मला वाटत नाही असे ट्वीट करत यापुढे अजून चार नेत्यांच्या चौकशीला गती आली असून आगे आगे देखो होता है क्या असा इशारा किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.

( हेही वाचा : ‘द काश्मीर फाईल्स’वर पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले पंतप्रधान मोदी? )

कोण आहेत हे चार नेते?

मुंबई उच्च न्यायालयाने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांना पुन्हा एकदा दणका दिला आहे. ईडी विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाकडून मलिकांना दिलासा देण्यात आलेली नसून उच्च न्यायालयाने ईडीच्या कारवाईविरोधात केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. तर, अनिल देशमुख यांच्या विरोधात भक्कम पुरावे, साक्षीदारांच्या जबाबात तफावत आणि देशमुख यांनी मनी लॉंड्रिंग केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, या कारणामुळे न्यायालयाने देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या पार्श्वभूमीवर अजून काही दिवस तरी, नवाब मलिक आणि अनिल देशमुख जेलच्या बाहेर येतील असे मला वाटत नाही असे किरीट सोमय्या म्हणाले.

तसेच आता संजय राऊत, अनिल परब, हसन मुश्रीफ, यशवंत जाधव या चार नेत्यांच्या चौकशीला गती प्राप्त झाली आहे, आगे आगे देखो होता है क्या असे ट्वीट करत किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.