मनी लॉउडरिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते, मंत्री नवाब मलिक यांना ईडीने बुधवारी पहाटे ताब्यात घेतले, त्यानंतर ८ तास चौकशी केल्यानंतर मलिक यांना अटक करण्यात आली. तर, यापूर्वी महाविकास आघाडीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. आधी अनिल देशमुख, आता नवाब मलिक आणि आता पुढचा नंबर अनिल परबांचा लागणार आहे असे ट्वीट करत किरीट सोमय्यांनी परबांच्या अटकेचे संकेत दिले आहेत. तसेच लवकरच महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार असे सोमय्यांनी सांगितले आहे.
( हेही वाचा : ८ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक )
तिसरा नंबर अनिल परबांचा लागणार!
अनिल देशमुख, नवाब मलिकांनंतर आता तिसरा नंबर अनिल परबांचा लागणार आहे. ठाकरे सरकारने कितीही दादागिरी, माफियागिरी केली तरी, उद्धव ठाकरेंच्या घोटाळेबाजांना आम्ही सोडणार नाही. ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांनी घोटाळे केले आहेत त्यामुळे आता आम्ही महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार असा विश्वास भाजपच्या किरीट सोमय्यांनी व्यक्त केला आहे.
( हेही वाचा : जांबोरी मैदानाखाली असे काही आढळले ज्याने मैदानाला मिळेल संजीवनी )
Anil Deshmukh ke bad Nawab Malik & than Anil Parab.
Uddhav Thackeray Sarkar ke sabhi Ghotalebaj ko Hisab Dena Padega @BJP4India @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 23, 2022
अनिल देशमुखांना अटक
८ तास चौकशी केल्यानंतर मलिक यांना अटक करण्यात आली. अंडरवर्ल्डकडून जमीन घेतल्याचा आरोप मलिक यांच्यावर आहे. इक्बाल कासकर या व्यक्तीने मलिक यांचं नाव घेतल्यानंतर मलिकांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. आठ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर ईडीने मलिकांवर अटकेची कारवाई केली आहे. मलिक जेव्हा ईडीच्या कार्यालयाबाहेर आले, तेव्हा त्यांना थेट जेजे रुग्णालयात वैद्यकीय चौकशीसाठी नेण्यात आले.
Join Our WhatsApp Community#NawabMalik
नवाब मलिकांनंतर अनिल परब! किरीट सोमय्यांचे संकेत @KiritSomaiya #KiritSomaiya #anilparab pic.twitter.com/xSqqTc0V1u— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) February 23, 2022