भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली, त्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांनी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली दिवस-रात्र काम केले. आज सरकारला अडीच वर्षे पूर्ण होत असताना राऊत हे शरद पवारांचे अनुयायी आहेत, असे एका बाजूला म्हटले जात आहे. अशा वेळी मात्र दुसऱ्या बाजूला संजय राऊत हे शरद पवारांनाच आव्हान देण्याची भाषा बोलू लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांचे काय होणार?
मागील तीन वेळा शिरूर येथे खासदार राहिलेले शिवसेने नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे भविष्यात पुन्हा या भागातून संसदेत जातील, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिरुरमध्ये जाऊन केला. आढळरावांनी शिवसेनेसाठी केलेले काम मोठे आहे. त्यांच्या पाठीमागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खंबीरपणे उभे आहेत. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल, असेही राऊत म्हणाले. त्यामुळे सध्या शिरुर लोकसभेचे खासदार असलेले राष्ट्रवादीचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांचे काय होणार?, असा प्रश्न राऊतांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. खासदार संजय राऊत कालपासून पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी आढळरावांचे होम ग्राऊंड असलेल्या शिरुर-आंबेगावमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आढळराव पाटील यांचे शिवसेनेसाठीचे योगदान अधोरेखित करताना एकप्रकारे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना इशारा दिला.
Join Our WhatsApp Community