केंद्र सरकारने बंदी घातलेल्या शीख फॉर जस्टीस या खलिस्तानी (Khalistani) संघटनेचा नेता गुरपतवंत सिंग पन्नूच्या अडचणी वाढल्या आहेत. एनआयएने पन्नूच्या अमृतसर, चंडीगढमधील मालमत्ता जप्त केल्या आहेत. पन्नू सध्या अमेरिकेत वास्तव्यास असून तो तेथून सतत्याने भारताविरोधात गरळ ओकणारे व्हिडीओ प्रसारित करतो.
एनआयएने जप्त केलेल्या मालमत्तेत अमृतसर जिल्ह्याच्या बाहेरील खानकोट या वडिलोपार्जित गावातील शेती आणि सेक्टर १५, सी चंदीगडमधील त्याच घर यांचा समावेश आहे. आता या मालमत्तेवरील पन्नूचा हक्क संपला असून ही सरकारी मालमत्ता असेल असा या जप्तीचा अर्थ आहे. २०२० मध्येही त्याच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. याचा अर्थ असा होता की तो मालमत्ता विकू शकणार नव्हता. परंतु या पावलानंतर पन्नूनं मालमत्तेचे मालकी हक्क गमावले आहेत.
खलिस्तानी (Khalistani) दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या कॅनडात झालेल्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये तणाव वाढत आहे. खलिस्तानवादी गुरपतवंत सिंग पन्नू हा कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदूंना धमकावत त्यांना देश सोडण्यास सांगत आहे. गुरपतवंत सिंग पन्नू हा मूळचा पंजाबमधील खानकोट येथील असून तो सध्या अमेरिकेचा नागरिक आहे. परदेशात राहून तो खलिस्तानी (Khalistani) कारवाया करत आहे. शीख फॉर जस्टीस या संघटनेवर २०१९ मध्ये भारताने बंदी घातली आहे.
(हेही वाचा Mumbai Airport : धावपट्ट्यांच्या दुरुस्तीकरिता मुंबई विमानतळ १७ ऑक्टोबरला बंद, विमानतळ प्रशासनाचा निर्णय)
Join Our WhatsApp Community