एनआयएच्या अटकेत असलेला निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याच्या चौकशीत रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. ठाण्यातील खाडी आणि मिठी नदी येथे मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणातील आणि मनसुख हिरेनच्या हत्येचे पुरावे नष्ट करण्यासाठी प्रयत्न केल्याचे एनआयएला तपासात आढळून आले.
शोधकार्यात सापडले पुरावे
रविवारी एनआयएच्या पथकाने कुर्ल्यातील मिठी नदीतून एक कंप्यूटर सिपीयू, डिव्हीआर आणि गाडीची नंबर प्लेट हस्तगत केली आहे. स्फोटकाने भरलेली गाडी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ ठेवल्याप्रकरणी एनआयएकडून अटक करण्यात आलेल्या मुंबई गुन्हे शाखेचा निलंबित अधिकारी सचिन वाझे याने या सर्व कटात आणि गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू एक-एक करुन एनआयएच्या हाती लागत आहेत. गुन्हयात वापरलेल्या मोटारी, कपडे इत्यादी हस्तगत करण्यात आल्यानंतर एनआयएकडून आणखी पुराव्यांचा शोध घेण्यात येत आहे.
(हेही वाचाः …म्हणून वाझेचे सारे मालक चिंतेत! देवेंद्र फडणवीसांचा टोला!)
काय आहे त्या सीपीयुमध्ये?
रविवारी दुपारी एनआयएचे पथक सचिन वाझे याला घेऊन कुर्ल्यातील मिठी नदी परिसरात आले होते. या पथकाने सफाई कर्मचारी यांच्या मदतीने मिठी नदीत शोधकार्याला सुरुवात केली. हे शोधकार्य सुरू असताना मिठी नदीत एक सिपीओ, एक डिव्हीआर आणि गाडीची नंबर प्लेट आढळून आली आहे.. एनआयएने डिव्हीआर आणि सीपीओ ताब्यात घेऊन तपासणीसाठी फॉरेन्सिककडे पाठवले आहे. उशिरापर्यत सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने मिठी नदीत आणखी शोध काम सुरू होते.
Join Our WhatsApp Community