रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडणे, त्यानंतर त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांची हत्या होणे या दोन्ही प्रकरणाचा तपास सध्या एनआयएने हाती घेतला आहे. याप्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर वाझेला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. वाझेच्या चौकशीतून या सर्व प्रकरणाचे संबंध एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा याच्यापर्यंत पोहचले असावे. त्यानुसार बुधवारी, १७ जून रोजी सकाळी ६ वाजता एनआयएने प्रदीप शर्मा याच्या घरावर छापा मारला असून त्याची चौकशी सुरु केली, त्यानंतर दुपारी १२ वाजता शर्मा याला अटक करण्यात आली.
#MansukhHiren Murder #NIA at Residence of #PradipSharma Leader & Candidate of #ShivSena
#SachinVaze Shivsena Spoke Person is in Jail
#Prado Car used for Mansukh Murder was supplied by Shivsena Minister #AnilParab 's Partner's PartnerIt's Shivsena Mafia Sena @BJP4India pic.twitter.com/gfxUkiadqU
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 17, 2021
शिवसेनेचे प्रवक्ता सचिन वाझे जेलमध्ये गेले आणि आता शिवसेनेचे उपनेते प्रदीप शर्मा हे जेलमध्ये जाणार आहे. या सर्वांचे मंत्री अनिल परब यांच्यासह संबंध आहेत. त्यामुळे तपस यंत्रणा परब यांच्यापर्यंत पोहचणार आहे आणि उद्धव ठाकरे यांची माफिया टोळी गजाआड जाणार.
– किरीट सोमय्या, भाजप नेते
(हेही वाचा : ९ तासांच्या चौकशीनंतर प्रदीप शर्मा एनआयए कार्यालयातून बाहेर! गूढ वाढले)
शर्माला लोणावळ्यातून घेतले ताब्यात!
एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा याच्या घरी एनआयएच्या एका पथकाने छापा मारला, तर दुसऱ्या पथकाने लोणावळ्यातील एका रिसॉर्टमधून शर्मा याला ताब्यात घेतले. हे पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले. शर्मा याला मुंबईत आणल्यावर त्याला अधिकृत अटक करण्यात आली.
सक्षम पुराव्यासह झाली अटक!
शर्मा याने सचिन वाझेला स्फोटके ठेवणे व मनसूख हत्या प्रकरणात मदत केल्याच्या आरोपाखाली एनआयएच्या हाती पुरावे लागले. अंधेरी येथील शर्मा याच्या निवासस्थानी टाकलेल्या छापेमारीत एनआयएच्या हाती या प्रकरणाच्या संबंधी काही महत्वाचे तांत्रिक पुरावे हाती लागले आहेत. पुराव्यावरून अखेर प्रदीप शर्मा याला अटक करण्यात आली आहे. शर्मा याच्यावर यापूर्वीच संशय होता, त्याची या प्रकरणात चौकशी देखील करण्यात आली होती. अंटालिया स्फोटके आणि मनसूख हिरेन प्रकरणातील ही ८वी अटक असून ठाण्यातील आणखी एक अधिकारी एनआयएच्या रडार आहे. या अधिकाऱ्याला देखील लवकरच चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
प्रदीप शर्माला २८ जूनपर्यंत एनआयए कोठडी
एनआयएने प्रदीप शर्मा याच्यासह मनीष सोनी आणि सतीश या तिघांना अटक केली आहे. या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना २८ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली. मनीष आणि सतीश हे दोघे प्रदीप शर्मासाठी काम करतात. त्याचे पंटर म्हणून ओळखले जातात. मनसुख हिरेन याच्या हत्येत या दोघांचा समावेश आहे. विनायक शिंदेसह मनीष आणि सतीश मनसूखला मारण्यासाठी एका कारमध्ये होते व त्यांनीच मृतदेह खाडीत फेकला होता. ज्या तवेरा गाडीत मनसूखची हत्या झाली ती गाडी आरोपी संतोष शेलारची आहे. या गाडीच्या फॉरेन्सिक तपासणीनंतर काही महत्वाचे डीएनए मिळाले, जे या आरोपींचे आहेत ते महत्वाचे पुरावे आहेत, असे एनआयएने म्हटले. शर्माच्या घरातून एक पिस्तुल आणि जिवंत काडतुसे सापडले आहेत. एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि पिस्तुल कशासाठी, असा प्रश्न एनआयएने कोर्टात उपस्थित केला. त्यावर शर्माने सांगितले कि, 1997 साली हे पिस्तुल मला मिळाले होते. यासंदर्भातले सगळे पुरावे आणि कागदपत्रे माझ्याकडे आहेत. त्या पिस्तुलचे लायसन्स माझ्याकडे आहे, फक्त ते मला रिन्यू करता आले नाही, पण त्याची प्रोसिजर बाकी आहे. मनसूख यांची हत्या ज्या दिवशी झाली, त्या दिवशी वाझेने त्याला फोन करून घोडबंदर रोडला बोलवले होते. त्यावेळी वाझेसोबत सुनील माने होते. दोघासोबत मनसूख गाडीत बसला आणि त्यानंतर मनसूखला वाझे आणि माने याने इतर आरोपीकडे सोपवले.
स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा उलगडा होणार!
मनसुख हिरेन याची हत्या का करण्यात आली हे जरी उघडकीस आले असले तरी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार तसेच त्यात मिळालेल्या धमकीच्या पत्राचे गूढ आद्यप समोर आलेले नाही. स्फोटकांनी भरलेल्या कार ठेवण्यामागे नेमके काय कारण असू शकते, याबाबत अनेकांना उत्सुकता लागलेली आहे, त्यात अनेक तर्कवितर्क काढण्यात आले होते, मात्र खरे कारण समोर आलेले नव्हते. परंतु प्रदीप शर्माच्या अटकेनंतर हे गूढ उकलण्याची शक्यता असून लवकरच आंबानी यांच्या घराजवळील स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यामागच्या कारणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
प्रदीप शर्माची वादग्रस्त पार्श्वभूमी!
एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा याच्या अंधेरीमधील घरावर हा छापा टाकण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रदीप शर्माच्या घऱाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणात एनआयएने याआधी माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा याची चौकशी केली होती. अंबानी यांना धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येशी शर्मा यांचा संबंध असावा, असा संशय एनआयएला आहे. शर्मा याला लखनभैया बनावट चकमक प्रकरणी अटक झाली होती. सुमारे तीन वर्षे तो कारागृहात होता. मनसुख हत्येप्रकरणी एनआयएने अटक केलेला निलंबित पोलिस शिपाई विनायक शिंदे लखनभैया हत्या प्रकरणात सहआरोपी होता. या गुन्ह्यातून शर्मा वगळता उर्वरित सर्व आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा ठोठावली. निर्दोष मुक्त झाल्यानंतर शर्मा यालाही पुन्हा सेवेत घेण्यात आले. सध्या चर्चेत असलेले परमबीर सिंह ठाणे शहरात पोलिस आयुक्त असताना शर्मा याच्याकडे तेथील खंडणीविरोधी पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी होती. शर्मा यांच्याकडे ७ एप्रिलला सुमारे आठ तास चौकशी केल्यानंतर ८ एप्रिलला त्याला एनआयएने पुन्हा चौकशीस बोलावले होते.
Join Our WhatsApp Community