पंतप्रधानांच्या खासगी सचिवपदी Nidhi Tiwari यांची नियुक्ती

76

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी (Nidhi Tiwari) यांची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारने ही नियुक्ती केली असून याबाबतचे निवेदनही जारी केले आहे.निधी तिवारी या नोव्हेंबर 2022 पासून पंतप्रधान कार्यालयात (Prime Minister’s Office पीएमओ) उपसचिव म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निरस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार विभागात अवर सचिव होत्या.

(हेही वाचा – वक्फच्या मालमत्तांवर कब्जा करणारेच विधेयकाला विरोध करत आहेत; Kiren Rijiju केले ‘हे’ आवाहन)

याबाबत केंद्र सरकारने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हंटले की, निधी तिवारी या 2014 बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएश) अधिकारी आहेत. त्या प्रामुख्याने परराष्ट्र व्यवहार, अणुऊर्जा आणि सुरक्षा व्यवहार यासह राजस्थान राज्याशी संबंधित कामकाज पाहत होत्या.

कार्मिक व प्रशिक्षण विभागाने 29 मार्च रोजी जारी केलेल्या निवेदनानुसार, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांची नियुक्ती तात्काळ प्रभावाने मंजूर केली आहे. दरम्यान, आतापर्यंत विवेक कुमार आणि हार्दिक सतीशचंद्र शहा हे दोन अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खासगी सचिव (Private Secretary) म्हणून काम पाहत होते. निधी तिवारी यांनी 2013 च्या सिव्हिल सेवा परीक्षेत 96 वा क्रमांक मिळवला होता. त्या वाराणसीच्या मेहमूरगंज येथील रहिवासी आहेत. वाराणसी हा 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ आहे. सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी, त्या वाराणसीत सहाय्यक आयुक्त (वाणिज्य कर) म्हणून कार्यरत होत्या आणि नोकरी करत परीक्षेची तयारी करत होत्या. (Nidhi Tiwari)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.