राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एका तरुणावर कारवाई करण्यात आली होती. पण निखिल भामरे नावाच्या या तरुणाला जेलमध्ये डांबण्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला सुनावले. सोशल मीडियावरील पोस्टवरून गुन्हे दाखल करणे किती योग्य आहे? शरद पवार यांना तरी हे आवडेल का? असा सवाल न्यायालयाने केला.
काय म्हटले न्यायालयाने?
‘वेळ आली आहे बारामतीच्या गांधींसाठी बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायचा आहे’, अशा आशयाचे ट्विट निखिल भामरे या तरुणाने केले. निखिलचे ट्विट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रिट्विट केले आणि आनंद परांजपे यांनी तक्रार केली आणि निखिल परांजपे याला अटक केली. १७ मे पासून निखिल अटकेत आहे. २१ वर्षीय निखिल भामरे याला यामुळे अटक झाली. त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी म्हटले की, एक ट्विट एफआयआरचा आधार कसा असू शकतो? रोज हजारो ट्विट केले जातात त्याची दररोज पडताळणी करणार का, २१ वर्षीय तरुणाला आणखी किती काळ तुरुंगात डांबून ठेवणार आहात, अशा प्रकारचे एफआयआर आम्हाला नकोच, त्याच्या जामिनाला विरोध न करून एका तरुणाला वाईट मार्गावर जाण्यापासून वाचवले याचे समाधान तुम्हाला घेता येईल, एका तरुणाला दीर्घकाळ कारागृहात ठेवणे हे उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या शरद पवारांना आवडणार नाही, असे सूचित करत या जामिनाला विरोध करू नये, असे न्यायालायने सुचवले आहे.
(हेही वाचा विद्यार्थ्यांना एकदा तरी अंदमानात नेऊन वीर सावरकरांनी भोगलेल्या यातना दाखवा! पंतप्रधानांचे आवाहन)
Join Our WhatsApp Community