Lok Sabha Election 2024 : अजित पवारांना धक्का देत निलेश लंके लोकसभा लढवणार

181
आमदार निलेश लंके यांनी अखेर अजित पवार यांची साथ सोडली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात दाखल झाले आहेत. आता ते तुतारी चिन्हावर लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढविणार आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखेविरुद्ध निलेश लंके अशी लढत होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नगरमध्ये शरद पवार विरुद्ध विखे कुटुंब असा जोरदार सामना रंगणार आहे.
पारनेरमधील सुपा येथे आमदार निलेश लंके यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांनी तुतारी चिन्हावर लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढण्याची घोषणा केली आहे. याचवेळी भावनिक होत निलेश लंके यांनी आपण लवकरच ईमेल द्वारे आमदार पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना पाठवणार असल्याचे देखील बोलून दाखवले.

विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्ला

कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करीत असताना निलेश लंके यांनी विखे पिता-पुत्रांवरती विकासकामांसाठी पंधरा टक्के रक्कम घेतल्याचा आरोप देखील लावला. स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी दुसरे मेडिकल कॉलेज होऊन दिले नाही, असा आरोप देखील लंके यांनी विखेंवरती लावत असताना जमलेल्या पारनेरच्या मतदारांना भावनिक आवाहन करीत ही लढाई माझी एकट्याची नसून यामध्ये प्रत्येकाने मी उमेदवार असल्याप्रमाणे कामाला लागा असे आवाहन देखील केले. या निवडणुकीस पैशांचे आमिष दाखवले जातील, या आमिषाला न भुलता आणलेले पैसे परत घेऊन जा म्हणण्याची ताकद कार्यकर्त्यांनी आपल्यापाशी बाळगावी. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची आहे, असे भावनिक आवाहन निलेश लंके यांनी केले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.