सत्तेत बसून पिसाळलेल्या कुत्र्यासारखे वागू नका… निलेश राणे संतापले!

आदित्य ठाकरे तेव्हाच्या मुंबई कमिश्नरांना सुशांतसिंग राजपूतची केस चालू असताना का भेटायला जायचे?, असा सवाल करतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अधिकृत विषयासाठी पोलिसांना भेटले असून, सत्तेत बसून पिसाळलेल्या कुत्र्यासारखे वागू नका, असा सल्ला भाजपचे नेते व महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी नवाब मलिक यांना दिला आहे.

केंद्र-राज्यात रंगला जंगी सामना

राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रेमडेसिवीरचा राज्यात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. एकीकडे राज्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार होत आहे तर, दुसरीकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधील नेत्यांमध्ये रेमडेसिवीरवरुन आरोप-प्रत्यारोपांचा जंगी सामना पहायला मिळत आहे.

(हेही वाचाः मुंबई पोलिसांनी एफडीएवर फोडले ‘खापर’! काय आहे पोलिसांचे म्हणणे? वाचा…)

काय म्हणाले निलेश राणे?

ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड डिसीपी कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मालिकांनी केलेल्या आरोपांना भाजपाच्या वतीने निलेश राणे यांनी चोख उत्तर दिले आहे. नवाब मलिक स्वतःलाच चावलंय वाटतं, अशा शब्दांत त्यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका केली. कोरोना रुग्णांना आरोग्य सेवा चांगली देऊन रुग्णांचे जीव वाचवा, असे देखील निलेश राणे यांनी सांगितले.

नवाब मलिक यांचा आरोप

राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर फडणवीस, दरेकर, आमदार प्रसाद लाड आणि स्थानिक आमदार पराग अळवणी पोलिस ठाण्यात पोहोचले होते. पोलिसांना काही माहिती मिळाली तर ते चौकशीसाठी बोलावत असतात. काळाबाजार रोखणं हे पोलिसांचं काम आहे. पण ब्रुक फार्मा कंपनीच्या या मालकासाठी राज्यातील दोन विरोधी पक्षनेते थेट पोलिस ठाण्यात गेले. एखादी काही घटना घडली तर विरोधी पक्षनेते फोनवरुन माहिती घेत असतात. पोलिसांशी चर्चा करत असतात. पण प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात जात नाहीत. मात्र फडणवीस, दरेकर गेले. डोकानियाला पोलिसांनी चौकशीला बोलावलं म्हणून महाराष्ट्रातील संपूर्ण भाजप का घाबरली? फडणवीस पेशाने वकील आहेत, ते डोकानियांचं वकीलपत्र घेऊन बाजू मांडत होते की त्यांच्याशी संबंध आहेत म्हणून बाजू मांडत होते?, विरोधी पक्षनेत्यांचा डोकानियाशी संबंध काय?, असे सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले आहेत.

(हेही वाचाः गृहमंत्री म्हणाले पोलिसांवरचा दबाव खपवून घेणार नाही!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here