भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुहागरमध्ये ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात शुक्रवारी बाचाबाची झाली. यावेळी राणे आणि ठाकरे समर्थकांनी दगडफेक करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
भाजपचे आमदार, भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांची गुहागर येथे जाहीर सभा होती. भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात तळी येथे होत असलेल्या सभेला विरोध केला जात होता. निलेश राणे यांच्या सभेपूर्वी हा राडा झाला. यामुळे कोकणातील वातावरण तापलं आहे.
(हेही वाचा – Maratha Reservation: धनगर समाजाला मोठा धक्का, मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली )
Join Our WhatsApp Community