साखर उद्योगावरील आर्थिक संकटाला वाचा फोडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याच्या एका पत्रावरून माजी खासदार निलेश राणे आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यामध्ये ट्विटर युद्ध रंगले होते. हा वाद इतका टोकाला गेला होता की, निलेश राणे यांनी खालच्या भाषेत रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. मात्र आता निलेश राणे यांना कोरोना झाला हे समजताच रोहित पवार यांनी सर्व मतभेद बाजूला ठेवत निलेश राणे यांना लवकर बरे होण्यासाठी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान त्यांच्या या ट्विटला निलेश राणे यांनी देखील उत्तर दिले असून, मी आपला आभारी असल्याचे निलेश राणे म्हणालेत.
रोहित पवार यांचे ट्विट
.@meNeeleshNRane जी लवकर बरे व्हा. सर्वांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत. https://t.co/A4Y8gDS0AT
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 17, 2020
निलेश राणेंचे ट्विट
मी आपला आभारी आहे 🙏🏻 https://t.co/JjJ2XUHX31
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 17, 2020
नेमका काय होता वाद
लॉकडाऊनमुळे साखर उद्योग मोठ्या आर्थिक संकटात आहे व या उद्योगाला सावरण्यासाठी भरीव आर्थिक मदत करावी, अशी विनंती करणारे एक पत्र शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले होते. यानंतर ट्विट करत निलेश राणे यांनी साखर उद्योगाला आजवर देण्यात आलेल्या आर्थिक मदतीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘साखरेच्या प्रश्नावर महाराष्ट्रात आतापर्यंत किती पैसे खर्च झाले ह्याचे ऑडिट व्हायला हवे, अशी मागणी केली होती. ‘साखर कारखाने कोट्यवधींची उलाढाल करतात. राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षानुवर्षे साथ देत आले आहेत. तरीही साखर उद्योगाला वाचवण्याची मागणी केली जाते,’ याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. निलेश यांच्या टीकेला रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातूनच उत्तर देत पवार साहेबांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असतात. पंतप्रधान मोदीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी’, अशा शब्दांत रोहित यांनी निलेश यांना उत्तर दिले होते. मात्र त्यांनंतर निलेश राणे यांनी रोहित पवार यांना उत्तर देताना खालची भाषा वापरली होती. ‘मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही… कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली? मतदार संघावर लक्ष दे सगळीकडे नाक टाकू नकोस, नाही तर साखर कारखान्यासारखी हालत होईल तुझी असे म्हणत दुसऱ्या ट्विटमध्ये निलेश यांनी रोहित यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. ‘शेंबडे’ या शब्दाचा वापर करत साखरेवर बोललो की हे अस्वस्थ का होतात कुणास ठाऊक?, असा सवाल त्यांनी केला होता.
निलेश राणेंची सर्व वादग्रस्त ट्विट
बोलणाऱ्याची लायकी बघून उत्तर देतो मी. धमकी आणि कळ काढायची भाषा माझ्याबरोबर करायची नाही. प्रदर्शन नाही हा ट्रेलर आहे. तुझ काम माहीत आहे मला, बोलत राहिलास तर त्याचं पण ट्रेलर देईन मग लोकंच चप्पलेच्या प्रदर्शनात बसवतील तूला. https://t.co/TzfkkGo6q6
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 19, 2020
गल्लीतलं शेंबडं पोर लहान लहान गोष्टीसाठी कसं किर किर करत अस्त तसं एक शेंबडं माझ्या आजोबांच्या पत्रावर कोणी बोलू नका म्हणून किर किर करतंय… ह्या वांग्याची लायकी काय आमच्या नेत्यांवर बोलायची? कोपर्डीची घटना, मराठा क्रांती मोर्चे झाले पण हा लुक्का तेव्हा काही बोलाल नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 20, 2020
राष्ट्रवादीत व बाहेर रोहित पवारला कोणीही पसंद करत नाही (काही तृतीयपंथी सोडून) हे मागच्या दोन तीन दिवसात स्पष्ट झालं. राष्ट्रवादी पक्षातल्या अनेक मित्रांनी फोन करून माझं अभिनंदन केलं की बरं झालं त्या कारट्याला त्याची लायकी दाखवली… खूप उडत होता.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 21, 2020
रोहित पवार म्हणतो मी निलेश राणेच्या धमकीला घाबरत नाही… अरे येड्या धमकी दिलीच नाही मी अजून तुला… लुक्क्याना धमकी देत नाही मी. राहिला विषय विचारांच्या लेव्हलचा तर तुला समजेल त्याच भाषेत समजवलं तुला.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 23, 2020
Join Our WhatsApp Community