राणेंची केसरकरांना ऑफर! म्हणाले, “१ तारखे पासून आमच्याकडे…”

90

एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा उल्लेख करत पत्रकार परिषदेतून गौप्यस्फोट केला आहे. राणे पितापुत्र आणि दीपक केसरकर यांचा आधीपासूनच ३६ चा आकडा आहे. अनेकदा यापूर्वीही त्यांच्यात खटके उडाले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते, असे केसरकर यांनी सांगितले. त्यावेळी, आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत राणे कुटुंबांवर प्रहार केला होता. त्यानंतर, नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन केसरकरांना प्रत्युत्तर दिले. यानंतर आता, माजी खासदार आणि दुसरे राणेपुत्र निलेश राणे यांनी ट्विटरवरुन दिपक केसरकर यांना टोला लगावला आहे.

(हेही वाचा – राऊत जेलमधून ‘रोखठोक’ लिहिताय की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहितंय?; मनसेचा सवाल)

काय म्हणाले निलेश राणे

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांची बाजू घेतल्याने हा वाद आणखी पेटल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता निलेश राणेंनी एक ट्वीटही केलं आहे. यामध्ये त्यांनी ट्विटरवरून दिपक केसरकरांना टोला लगावला आहे. यामध्ये निलेश राणे म्हणाले, दीपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे. नोकरी मागायची आहे, तर नीट मागा. १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे. आता त्यांच्या या खोचक ऑफरवर दीपक केसरकर काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठी राणेंनी प्रयत्न केले, असा खळबळजनक आरोप दीपक केसरकर यांनी केला होता. त्यानंतर केसरकर यांना चांगलीच तंबी दिल्याचे समजत आहे. शिंदे गट आणि भाजपाच्या रोषाचा सामना यानिमित्ताने दीपक केसरकरांना करावा लागत असल्याचे दिसत आहे.

काय म्हणाले नितेश राणे

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात राणे पिता पुत्रांनी आदित्य ठाकरेंची बदनामी केल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत आरोपांना उत्तर दिले. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचाराचे सरकार आहे. हिंदुत्ववाचा विचार आजून प्रखर झाला पाहीजे. यासाठी 166 आमदार एकत्र आले आहेत. हिंदुत्वाचे रक्षण करणे आणि हिंदुत्वाला ताकद देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. यामुळे आमच्यासाठी हिंदुत्व हा विषय महत्वाचा आहे. हिंदुत्वासाठी सगळ्या गोष्टी माफ आहेत, येवढेच मी सांगतो, असे नितेश राणे म्हणाले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.