‘आदित्य ठाकरेंची ड्रग्स टेस्ट होणार’?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना ड्रग्स कनेक्शन समोर आले असून, संपूर्ण बॉलिवूड ड्रग्सच्या विळख्यात अडकल्याची टीका अभिनेत्री कंगणा रणौत हिने केली आहे. मात्र आता चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पूत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची ड्रग्स टेस्ट करण्याची मागणी होऊ लागली असून, भाजपा नेते निलेश राणे यांनी ही मागणी केली आहे.

काय म्हणाले निलेश राणे

फक्त रणवीर-रणबीर यांनीच का? आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्ज चाचणी करावी, असे मला वाटते. कारण तेही बॉलिवूडच्या आतल्या गोटातील कलाकारांच्या जवळचे आहेत असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे. याधाही निलेश राणे यांनी  सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचे सांगत आदित्य ठाकरे यांच्यावर संशय व्यक्त केला होता.

कंगणालाही झापले

विशेष बाब म्हणजे एकीकडे भाजपाचे नेते अभिनेत्री कंगणा रणौत हिच्या बाजूने बोलत असताना दुसरीकडे निलेश राणे यांनी कंगणाला चांगलेच झापले आहे. ‘२/३ अधिकारी प्रेशरमध्ये आले म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्या इतकी राणावत कोण लागून गेली?? SSR आणि सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही असे निलेश राणे म्हणालेत.

शेलारांचाही आदित्यवर निशाणा

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी देखील याआधी आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टिका केली असून, नाईटलाईफ संस्कृतीचे पुरस्कर्ते तसेच ड्रग्स-पब अँड पार्टी गँगने सुशांतसिंह राजपूतचा बळी घेतला. या ड्रग्स-पब-पार्टी टोळीचे सदस्य कोण आहेत? त्यांचे संरक्षण कोण करीत आहे? मुंबई पोलिसांच्या तपासाची दिशा कोणी बदलली? ईडी आणि सीबीआय सत्य समोर आणते आहे. खरे चेहरेही समोर येतीलच! न्याय होईल असे शेलार म्हणाले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here