एका व्यक्तीने तीन चोरांचे सरकार हलवले! निलेश राणेंचा हल्लाबोल 

भाजपाचे नेते किरीट सोमय्या रविवारी कोल्हापूर येथे रेल्वेने निघाले मात्र त्यांना पोलिसांनी कोल्हापूरला येऊ दिले नाही, त्यांना कराड येथे शासकीय विश्रामगृहात ठेवण्यात आले. सोमवारी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री हसन मुश्रीफ यांचा आणखी घोटाळा उघड करणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटल्याने खळबळ उडाली. त्यावर भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी एका व्यक्तीने तीन चोरांचे सरकार हलवून टाकले आहे, असा शब्दांत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. तर दोन दिवसांनी आपण पुन्हा कोल्ह्यापुरला येणार आहे, असे सोमय्या म्हणाले.

काय म्हणाले निलेश राणे? 

किरीट सोमय्याजी यांनी महाविकास आघाडीची इतकी वाट लावली की राज्य सरकारला त्यावर उत्तर मिळत नाहीये. एका व्यक्तीने तीन चोरांचं सरकार हलवून टाकलं यावरून किरीट सोमय्या यांची उंची कळते आणि ठाकरे सरकार ची लायकी कळते. किरीटजी आपण लढत असेच राहावे…

(हेही वाचा : कंगनाला आज होणार अटक?)

काय म्हणाले किरीट सोमय्या? 

पोलिसांनी मला निषेधाच्या आदेशान्वये कराडला थांबवले, ९ वाजता कराड सर्किट हाऊसला मी पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here