- प्रतिनिधी
भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असून याबाबत नुकतीच नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. निलेश राणे यांना कुडाळ मालवण येथून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याची चर्चा सुरू असून, त्यामुळे शिवसेना उबाठाचे आमदार वैभव नाईक यांची डोकेदुखी वाढणार आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीत अखेर भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांनी बाजी मारली आणि कोकणात राणे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यातच आता नारायण राणेंनी त्यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणेंसाठी (Nilesh Rane) एकनाथ शिंदे यांच्याकडे जोरदार फिल्डिंग लावल्याचे समजते. २०१४, २०१९ या दोन सलग निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेले निलेश राणे मागील काही महिन्यांपासून पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत.
(हेही वाचा – ‘लुटारू कॉंग्रेसपासून सावधान रहा, कारण…’ PM Narendra Modi यांचे महाराष्ट्रातून जनतेला आवाहान )
कुडाळ मतदारसंघात उबाठाचे वैभव नाईक हे विद्यमान आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीला खासदार नारायण राणे आणि उबाठाचे विनायक राऊत यांच्यात चुरशीची लढत झाली होती. कुडाळ-मालवण मतदारमधून नारायण राणे यांना ७९ हजार ५१३ मते तर राऊतांना ५३ हजार २७७ मते मिळाली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना कुडाळ-मालवणमधून चांगलीच मते मिळाली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांची गोळाबेरजेत फरक पडणार एवढं मात्र नक्की.
निलेश राणे (Nilesh Rane) हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा कोकणसह महाराष्ट्राच्या राजकारणात जोर धरू लागली आहे. या चर्चेचे कारण म्हणजे भाजपा खासदार नारायण राणे यांनी ‘वर्षा’ या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट. या भेटीनंतर राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या मतदारसंघावर निलेश राणे यांच्यासाठी भाजपाचा दावा आहे. मात्र, जागावाटपात कुडाळ विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे निलेश राणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेकडून कुडाळ-मालवणचे उमेदवार असतील, असेही सांगण्यात येते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community