राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असून, राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना १० हजार रुपयांची तात्काळ मदत जाहीर केली. मात्र चार दिवस उलटूनही अद्याप मदत पोहोचली नसल्याने, आता नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. ठाकरे सरकारने घोषणा केली पण प्रत्यक्षात खात्यात पैसे कधी येणार, असा प्रश्न आता स्थानिक विचारू लागले आहेत. दरम्यान यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले निलेश राणे?
काय पाप केलंय कोकणाने शिवसेनेला निवडून देऊन, १० हजार रुपयांसाठी तडफडायला लावत आहेत. शिवसेनेला भरभरुन देणाऱ्या कोकणाला १० हजार पण एका झटक्यात नाही, तर इंस्टॉलमेंट मध्ये. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत, ज्यांच्या दौऱ्यावर जो खर्च होतो तितकी सुद्धा मदत नुकसानग्रस्तांना मिळत नाही, अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे.
काय पाप केलंय कोकणाने शिवसेनेला निवडून देऊन, १० हजार रुपयांसाठी तडफडायला लावतायत. शिवसेनेला भरभरून देणाऱ्या कोकणाला १० हजार पण एका झटक्यात नाही तर इंस्टॉलमेंट मध्ये. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्यांच्या दौऱ्यावर जो खर्च होतो तितकी पण मदत नुकसानग्रस्तांना मिळत नाही. https://t.co/zIPrkIxUJ1
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 2, 2021
(हेही वाचाः पूरग्रस्तांना मदत देण्यावरुन काय म्हणाले मुख्यमंत्री?)
सामंत म्हणाले उद्या जमा होणार
राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी चिपळूणकरांच्या खात्यात मंगळवारी पाच हजार रुपये जमा होतील, असे सांगितले. चिपळूणमधील बाधितांना तातडीची मदत म्हणून 10 हजारांपैकी 5 हजार रुपयांची मदत मंगळवारपासून खातेधारकांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. पूरग्रस्तांना सरकारकडून हा तात्पुरता दिलासा दिला जात आहे. सरकार लवकरच सर्व आढावा घेऊन पॅकेजची माहिती घेणार आहे, असे देखील सामंत यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community