अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर भाजपा नेत्यांकडून टीका होत असताना आता भाजपा नेते निलेश राणे यांनी खालच्या भाषेत आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शेण खाल्ल्यानंतर मंत्री असल्याची लाज वाटत असेल तर फक्त सोशल मीडियावर मंत्रिपदाचा उल्लेख पुसून काही होणार नाही. खरा पुरूष असशील तर राजीनामा दे आणि बाजूला हो अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
शेण खाल्ल्यानंतर मंत्री असल्याची लाज वाटत असेल तर फक्त सोशल मीडियावर मंत्रीपदाचा उल्लेख पुसून काही होणार नाही… खरा पुरूष असशील तर राजीनामा दे आणि बाजूला हो. pic.twitter.com/xafedq7ivE
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 2, 2020
काँग्रेस नेते शिवसेनेच्या पगारावर
दरम्यान निलेश राणे यांचा ट्विटवॉर सुरुच असून,त्यांनी काँग्रेस नेत्यांवर देखील टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस नेत्यांना पगारी ठेवले आहे. त्यावर अद्याप काँग्रेस आणि शिवसेनेकडून कोणत्याही नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही.
म्हणून निलेश राणेंची ‘आदित्य’वर टीका
आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलमधून पर्यटन आणि पर्यावरण मंत्री हे शब्द काढून टाकल्याची चर्चा दोन दिवसांपूर्वी रंगलेली होती. याचाच आधार घेत निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मात्र याआधीच आदित्य ठाकरे यांनी स्वत: पुढे येऊन स्पष्टीकरण दिले असून, २०१३ पासून मी माझ्या ट्विटर हँडलवरील बायो अजिबात बदललेला नाही. माझ्या इन्स्टाग्रामवरील प्रोफाईलमध्ये मी माझ्या खात्यांचा उल्लेख केल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community