धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपट 13 मे ला प्रदर्शित झाला. या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारीत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद दिघे यांचे कुंटुंब राजकारणात सक्रिय नाही, असे म्हटले आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, चर्चेचा विषय ठरला आहे.
निलेश राणेंचे ट्वीट
निलेश राणे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ही पोस्ट शेअर केली आहे. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, शिष्य एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्री, मुलगा खासदार, स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक, शाखाप्रमुख नाही पण निवडणूक आली की दिघे साहेब. आज दिघे साहेबांवर आधारित धर्मवीर नावाचा चित्रपट रिलीज झाला, पण त्यांच्या कुटुंबाचे कुठेच नाव नाही, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले होते.
बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री,
"शिष्य" एकनाथ शिंदें कॅबिनेट मंत्री, मुलगा खासदार, स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक, शाखाप्रमुख नाही पण निवडणूक आली की दिघे साहेब. आज दिघे साहेबांवर आधारित धर्मवीर नावाचा चित्रपट रिलीज झाला पण त्यांच्या कुटुंबाचे कुठेच नाव नाही.— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 13, 2022
( हेही वाचा: बूस्टर डोस माहीत नाही, पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल; राऊतांची भाजपवर फटकेबाजी )
असा पार पडला चित्रपटाचा खास शो
शुक्रवारी या चित्रपटाचा खास शो ठाण्यातील व्हिवियाना माॅल येथील सिनेपोलीस मल्टिप्लेक्समध्ये पार पडला. यावेळी उपस्थित पाहुण्याचे ढोल आणि लेझीम पथकाच्या तालास्वरात, मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
Join Our WhatsApp Community