काय हेडिंग वाचून दबकलात ना… थोडे थांबा. पण कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे हे निवडून आले. पण तिकीट वाटपावेळी उबाठाचे नेते खा. संजय राऊत यांनी आमची या मतदारसंघात ८५ हजार पदवीधरांची नोंदणी असल्याचा जो ठाम दावा करत ही जागा शिवसेनेला मागितली होती यावरून मग काँग्रेस सोबत ठाकरे यांच्या उबाठाने नेमका गेम करत सांगली लोकसभेचा वचपा काढल्याचे मानले जात आहे. (Maharashtra Graduate Election)
त्याचे कारण असे की, जर ही जागा महाविकास आघाडीतल्या मित्रपक्ष काँग्रेसला देण्यात आली होती त्यावेळी ठाकरे यांच्या सेनेच्या गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी आमची मतदार नोंदणी ८५ हजार असल्याचा ठाम दावा भर पत्रकार परिषद घेऊन केला होता. तरं काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांनी आमची मतदार नोंदणी ही सव्वालाख असल्याचा दावा केला होता. मग प्रश्न असा पडतो की जर डावखरे यांचा विजय झाला तर ठाकरेंच्या उबाठाने या मतदार संघात हाराकिरी करत लोकसभा निवडणुकीतील आपल्या उमेदवाराचे पराभवाचे उट्टे काढत भाजपाशी पडद्याआड मोठी आर्थिक उलाढाल केल्याचे मानले जात आहे. (Maharashtra Graduate Election)
(हेही वाचा – मीडियामध्ये अनावश्यक वक्तव्ये टाळा; PM Narendra Modi यांचा रालोआ खासदारांना गुरूमंत्र)
आणि येणारी आगामी विधानसभा निवडणुक ही खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यांना डोईजड जाणार याचे हे प्रतिक असल्याचे मानले जाते. कारण जर ठाकरे व काँग्रेस यांच्या मतदार नोंदणीची गोळाबेरीज केली तर ती पावणे दोन लाखांपर्यंत जाते. मग प्रश्न असा पडतो की काँग्रेसच्या उमेदवाराला दगाफटका होतोच कसा आणि जर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने खरंच सहानुभूती आहे असा जो दावा उबाठाकडून सातत्याने केला जातो त्यातही कोकण या स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या अभेद्य गडात ठाकरे यांना मतदारांनी नाकारणे म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा राज्यात भाजपाची सत्ता येऊन कोकणातून ठाकरे यांच्या शिवसेनेचा सुपडा साफ होण्याची धोक्याची घंटा ठाकरे यांच्यासाठी घातक असल्याचे मानले जाते. (Maharashtra Graduate Election)
एकमात्र नक्की की या पदवीधर मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा झालेला पराभव हा हायकमांडच्या जिव्हारी लागला असुन आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना सोबत घ्यायचे की स्वबळावर निवडणुका लढवायची यावर गंभीरतेने विचार केला जात असल्याचे काँग्रेसच्याच एका मोठया नेत्याने आपले नाव न छापण्याच्या अटीवर बोलताना सांगितले. तसेच आगामी दोन तीन महिन्यांच्या काळात आपला पूर्ण फोकस काँग्रेस फक्तं कोकणावर केंद्रित करणार असल्याचेही या नेत्याने स्पष्ट केले. (Maharashtra Graduate Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community