नीलम गोऱ्हेंचे उपसभापती पद कायम; तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी दिला निर्णय

174
नीलम गोऱ्हेंचे उपसभापती पद कायम; तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी दिला निर्णय
नीलम गोऱ्हेंचे उपसभापती पद कायम; तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी दिला निर्णय

शिवसेनेच्या ठाकरे गटाने उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केल्यानंतर यासंदर्भात कोण निर्णय घेणार, असा पेच निर्माण झाला होता. कारण सभापतीपद रिक्त होते. मात्र, विधिमंडळ सचिवालयाने यावर तोडगा काढला असून, तालिका सभापती निरंजन डावखरे यांच्याकरवी हा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार, तालिका सभापतींनी नीलम गोऱ्हेंचे पद आणि अधिकार कायम ठेवले आहेत.

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदें यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. याबाबत गोऱ्हे यांच्या विरोधात अपात्रतेची याचिका ठाकरे गटाने दाखल केली होती. त्यावर तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी निकाल दिला आहे.

(हेही वाचा – Wuhan lab : चीनच्या वुहान लॅबला अमेरिकेचे फंडिंग बंद; कोरोना नडला)

पक्षातरांच्या बाबतीत घेतलल्या आक्षेपात सभापती किंवा उपसभापती यांनी पक्षांतर केले, तर ते अपात्र ठरणार नाहीत. या पदाला तशी सूटही कायद्यात देण्यात आलेली आहे. निलम गोऱ्हे यांनी ज्या पक्षाला पाठिंबा दिला, तो पक्ष बदलला नाही. चिन्ह व नाव हे त्याच पक्षाचे आहे. त्यामुळे उपसभापती म्हणून गोऱ्हे यांचे पद संवैधानिक तरतूदीनुसार अधिकार अबाधित राहतील, असा निर्णय तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी दिला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.