राज्यसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी काँग्रेसचे (Congress) अनेक घटनाविरोधी निर्णय सप्रमाण मांडले. तसेच त्यांनी काँग्रेसच्या (Congress) अनेक घटनादुरूस्त्यांवर टीका केली. निर्मला सीतारमन म्हणाल्या की, या देशात झालेली पहिली घटनादुरूस्ती ही समाजमाध्यमांसाठी हानीकारक होती. या घटनादुरूस्तीचा आजही माध्यमांना फटका बसतो. अनेक खासदारांचा या दुरूस्तीला विरोध असूनही पंतप्रधान नेहरुंनी घटना दुरूस्ती केली, अशी टीका निर्मला सीतारमन यांनी काँग्रेसवर (Congress) केली.
( हेही वाचा : “मी नाराज…”, मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यानंतर Chhagan Bhujbal स्पष्टच बोलले)
पहिल्या घटनादुरूस्तीबद्दल निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालय १९५० साली एका खटल्यामध्ये कम्युनिस्टांच्या क्रॉसरोड्स आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर (Organiser ) या मुखपत्राच्या बाजूने निकाल दिला होता. परंतु त्याला प्रतिवाद म्हणून तत्कालीन अंतरीम सरकारने पहिली घटनादुरूस्ती केली. ज्यामुळे पुढे माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम काँग्रेस सरकारने केले होते, असा हल्लाबोल राज्यसभेत सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी केला.
स्वातंत्र्यसेनानी व तत्कालीन संविधानसभेचे सदस्य असणाऱ्या श्यामा प्रसाद मुखर्जी (Syama Prasad Mukherjee) यांनी पहिल्या घटनादुरूस्ती दरम्यान दिलेल्या इशाऱ्याबद्दल निर्मला सीतारमन म्हणाल्या की, पहिली घटनादुरूस्ती ज्यावेळेस संसदेच्या समोर ठेवण्यात आली, त्यावेळेस बरेच वाद प्रतिवाद करण्यात आले. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी त्यावेळेस म्हटले होते की ” तुम्ही कायद्याची निर्मिती करून, राज्यघटना तयार केल्याचा दावा करू शकता, परंतु अशा पद्धतीने घटनादुरूस्ती करून संविधानाचे अवमूल्यन करू शकत नाही. ही घटना लिहीण्यासाठी तुम्ही या देशातील जनतेवर विश्वास ठेवला, परंतु आता तुम्हीच त्यांच्या पाठीत चाकू घुसवत आहात, असे मुखर्जी म्हणाले. तसेच दरभंगा संस्थानाचे महाराज कामेश्वर सिंह (Kameshwar Singh) यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत म्हटले होते की, संविधानात असे बदल करणे अत्यंत अयोग्य आहे. अशा कृत्यांमुळे न्यायव्यवस्थेचे पावित्र्य राखले जाणार नाही. राज्यघटनेची अवहेलना करणे चुकीचे आहे, असे ते त्यावेळी म्हणाल्याचे सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी सांगितले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community