Nischalananda Saraswati : ‘धर्मांतराला राजकीय संरक्षण नको’, जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांचे विधान

शंकराचार्य या पदाची बदनामी म्हणजे त्यांची स्वत:ची बदनामी

35
Nischalananda Saraswati : 'धर्मांतराला राजकीय संरक्षण नको', जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांचे विधान
Nischalananda Saraswati : 'धर्मांतराला राजकीय संरक्षण नको', जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांचे विधान

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती (Nischalananda Saraswati ) ३ दिवसांच्या बिलासपूर (Bilaspur) दौऱ्यावर आहेत. तिथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी धर्मांतरणासारख्या महत्त्वाच्या विषयाला हात घातला. शंकराचार्य म्हणाले की, धर्मांतर करणाऱ्यांना राजकारण्यांकडून संरक्षण मिळते. मात्र तालिबानी राजवटीत मुसलमानाचे धर्मांतर करण्यास गेलेल्या चार ख्रिस्ती धर्मियांना तिथले तालिबानी फाशीची शिक्षा देतात. मात्र आपल्याकडे असे होताना दिसत आहे. त्यामुळे धर्मांतराणासारख्या गुन्ह्यात अटक केलेल्यांना एकतर फाशी द्यावी किंवा कारागृहात टाकावे, अशी मागणी शंकराचार्यांनी (Nischalananda Saraswati ) केली आहे.

( हेही वाचा : Yogi Government : अयोध्येत नवरात्रोत्सवात मांसविक्रीवर बंदी, योगी सरकारचा मोठा निर्णय)  

दरम्यान शंकराचार्य या पदाबाबत वारंवार प्रश्न उपस्थित करणाऱ्यांबद्दल (Nischalananda Saraswati ) ते म्हणाले की, आम्हा शंकराचार्यांना भाजपच्या सत्ताकाळात काँग्रेसचे (Congrees) लोक ‘भाजपवाले’, तर काँग्रेसच्या काळात भाजपचे (BJP) लोक काँग्रेसवाले म्हणतात. मात्र शंकराचार्य कुणाचेही समर्थक नाही, हे आधी लक्षात घ्यायला हवे. तसेच जो कुणी शंकराचार्य या पदाची बदनामी करेल, ती त्यांच्या स्वत:ची बदनामी असेल, अशी टीका ही बदनामी करणाऱ्यांविरोधात शंकराचार्यांनी (Nischalananda Saraswati ) केली.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.