भारताचे तुकडे करण्यासाठी USAID ने सोरोस यांच्या कंपनीला पाच कोटी दिले का? भाजपा खासदाराचा आरोप

45
भारताचे तुकडे करण्यासाठी USAID ने सोरोस यांच्या कंपनीला पाच कोटी दिले का? भाजपा खासदाराचा आरोप
भारताचे तुकडे करण्यासाठी USAID ने सोरोस यांच्या कंपनीला पाच कोटी दिले का? भाजपा खासदाराचा आरोप

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अमेरिकेच्या (America) अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यापासून अमेरिकेत अनेक क्षेत्रात उलथापालथ होत आहे. अशातच ट्रम्प यांनी अमेरिकन एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटला (USAID) वेसण घातली आहे. यूएसएआयडीकडून उद्योगपती जॉर्ज सोरोसच्या (George Soros) संघटनांना २६ कोटी डॉलर मिळाल्याचा आरोप ट्रम्प यांनी आधी केला होता. आता संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भाजपा खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.

( हेही वाचा : Meta Job Cut : मेटा कंपनीत ३,००० हून अधिक लोकांची कपात

भाजपा खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी अमेरिकन संस्था यूएसएआयडी कडून भारताचे तुकडे करण्यासाठी विविध संस्थांना निधी दिला गेल्याचा दावा केला आहे. तसेच याप्रकरणी दोषी आढळणाऱ्या लोकांना तुरूंगात टाकावे, अशी मागणी दुबे यांनी सरकारकडे केली आहे. यावेळी काँग्रेसचे अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस (George Soros) यांच्याशी संबंध असल्याचा आरोपीही निशिकांत दुबे यांनी केला आहे. तसेच यूएसएआयडीने (USAID) जॉर्ज सोरोसच्या (George Soros) ओपन सोसायटी फाऊंडेशनला (Open Society Foundation) भारताचे तुकडे पाडण्यासाठी पाच हजार कोटी रुपये दिले होते की नाही. त्याने राजीव गांधी फाऊंडेशनला पैसे दिले होते की नाही, हे आता विरोधी पक्षाने सांगावे , असे दुबे म्हणाले.

विविध संस्थांना यूएसएआयडीकडून (USAID) पैसे दिले गेल्याचा आरोप करताना निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी या सर्वांची चौकशी करण्याची तसेच ज्यांनी देशाचं नुकसान करण्यासाठी पैसे घेतले आहेत, त्यांना तुरूंगात टाकण्याची मागणी केली. दरम्यान दुबे यांनी आरोप केल्यानंतर काँग्रेसचे सदस्यही आक्रमक झाले तसेच त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.