काँग्रेस नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत संविधानावर बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकरांवर पुनः बिनबुडाचे आरोप केले. त्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वीर सावरकर यांची वारंवार केलेली स्तुती उद्धृत करून राहुल गांधी यांना गप्प केले.
View this post on Instagram
काय म्हणाले राहुल गांधी?
भारतीय राज्यघटनेची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्यात भारतीय काहीही नाही. मनुस्मृती हा असा धर्मग्रंथ आहे जो आपल्या हिंदू राष्ट्रासाठी वेदांनंतर सर्वात जास्त पूज्य आहे आणि ज्यातून आपला प्राचीन काळ आपल्या संस्कृती, चालीरीती, विचार आणि आचरणाचा आधार बनला आहे. या पुस्तकाने, शतकानुशतके, आपल्या राष्ट्राच्या आध्यात्मिक आणि दैवी वाटचालीचे संहिताबद्ध केले आहे. आज मनुस्मृति हा कायदा आहे. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते, भाजपाचे नेते वीर सावरकर यांनी म्हटले होते. तुम्ही तुमच्या नेत्याने लिहिलेले मान्य करता का, हे तुमच्या नेत्याने म्हटले होते, असे राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले.
(हेही वाचा मनुस्मृती म्हणते बलात्काऱ्यांना सोडा; Rahul Gandhi यांच्याकडून मनुस्मृतीचा अवमान )
उत्तर प्रदेशात मनुस्मृती लागू होत आहे, तिथे बलात्कार झालेल्या हाथरसमधील पीडित मुलीचे कुटुंब घरात घाबरून बसले आहे आणि गुन्हेगार बाहेर मोकाट आहेत. हे संविधानात कुठे लिहिले आहे, ते तुमच्या मनुस्मृतीत म्हटले आहे. तिथे तुमचे राज्य आहे, तिथे संविधान लागू नाही, तिथे मनुस्मृती लागू आहे, असेही राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले.
View this post on Instagram
काय म्हणाले निशिकांत दुबे?
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) घणाघाती हल्ला चढवला आणि त्यांच्यावर वारंवार राष्ट्रीय प्रतिमेचा अपमान केल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांच्या आजी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही वीर सावरकर यांचा कसा वारंवार आदर केला, हे दाखवण्यासाठी दुबे यांनी अनेक ऐतिहासिक तथ्यांवर प्रकाश टाकला.
View this post on Instagram
खासदार दुबे यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आठवण करून दिली की, इंदिरा गांधींनी १९७० मध्ये वीर सावरकरांच्या सन्मानार्थ एक टपाल तिकीट जारी केले होते, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान अमृततुल्य असल्याचे इंदिरा गांधी यांनी म्हटले. १९७९ मध्ये इंदिरा गांधींनी वैयक्तिकरित्या सावरकर ट्रस्टला त्यांच्या खात्यातून ११,००० रुपये दिले होते. १९८० मध्ये त्यांनी एका पत्रात वीर सावरकरांचे वर्णन “भारताचे एक दुर्मिळ सुपुत्र” असे केले आणि १९८३ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने त्यांच्या जीवनावर एक माहितीपट बनवला. दुबे यांनी सावरकरांबद्दल काँग्रेसच्या बदलत्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि राहुल गांधींनी (Rahul Gandhi) वारंवार केलेली टीका निराधार आणि केवळ वीर सावरकरांच्या वारशाचाच नव्हे तर त्यांच्या स्वत:च्या कुटुंबाने नेत्याच्या योगदानाची ऐतिहासिक पोचपावती दिली त्याचाही अवमान केला आहे, असे म्हणत राहुल गांधी कधीही सावरकर होऊ शकत नाहीत. वीर सावरकर त्यांच्यावर खोटेनाटे आरोप केले म्हणून राहुल गांधी यांनी वीर सावरकर आणि इंदिरा गांधी या दोघांच्या वारशाला कलंकित केल्याबद्दल माफी मागावी, अशीही मागणी केली.
Join Our WhatsApp Community