भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तसेच संजय राऊत हे सुधाकर बडगुजर यांचे गॉडफादर असल्याचा आरोप देखील (Nitesh Rane) नितेश राणे यांनी केला आहे.
(हेही वाचा – Reliance-Disney Merger : रिलायन्स आणि डिस्नीच्या विलिनीकरणातून जन्म घेणार ७०,३५२ कोटींची नवी कंपनी)
नेमकं प्रकरण काय ?
दहशतवादी सलिम कुत्ता डान्स प्रकारणानंतर सुधाकर बडगुजर हे नाव प्रचंड चर्चेत आले. कुत्तासोबत झालेल्या डान्स पार्टीत बडगुजर उपस्थित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून आता (Nitesh Rane) भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.
काय म्हणाले नितेश राणे ?
नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की; ”पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्या पार्टीमध्ये सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजर नाचताना दिसल्याचे सिद्ध झाले आहे. पण मी आजही सांगतो की, बडगुजर हा महत्त्वाचा विषय नाही. बडगुजरचा गॉडफादर कोण? ते कुणाच्या मांडीला मांडी लावून नाशिकमध्ये फिरतात? ते कुणाची गुंतवणूक ठेवतात? ते पाहणे महत्वाचे आहे आणि यामागे संजय राऊत आहे.”
संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात यावा :
पुढे बोलताना नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, ”बडगुजर यांची चौकशी करत असताना त्यांचे गॉडफादर असलेल्या संजय राऊतांचीही चौकशी झाली पाहिजे. त्यांच्यावरही देशद्रोहाचा खटला चालवण्यात यावा. दाऊद इब्राहिमच्या खास असलेल्या सलीम कुत्तासोबत यांचे संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे. यावरुन स्पष्ट होत आहे की, संजय राऊत देशद्रोही आहेत. त्यामुळे त्यांचीदेखील चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे.
(हेही वाचा – BCCI Contracts : फक्त इशान, श्रेयसच नाही तर ‘या’ चार ज्येष्ठ खेळाडूंनाही वगळलं)
सलीम कुत्ताचा पेरोलचा वेळ वाढवण्यासाठी संजय राऊतांचा फोन :
तसेच ”देशाच्या पंतप्रधानांवर संजय राऊतांनी बोलू नये. कारण त्यांच्याच कॅरेक्टरवर प्रश्न निर्माण झाले आहेत. बडगुजर यांच्यापेक्षा सलीम कुत्ताशी थेट संबंध असलेल्या राऊतांची चौकशी व्हावी. सलीम कुत्ताचा पेरोलचा वेळ वाढवण्यासाठी संजय राऊतांनी फोन केला होता. या सर्व प्रकरणाची चौकशी करावी. एकीकडे देशद्रोहींसोबत संबंध ठेवायचे आणि दुसरीकडे सकाळी पंतप्रधान मोदी खोटे बोलतात असे विधान करायचे. त्यांनी मोदीन्बद्दल बोलू नये”, असेही नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community