२००४ साली मुंबईत दंगली भडकवण्याचे उद्धव ठाकरेंनी दिले होते आदेश; नितेश राणेंचा गंभीर आरोप

280

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २००४ साली मुंबईत दंगली घडवण्यासाठी मातोश्रीवर बैठक घेतल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी बुधवारी केला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषद नितेश राणे बोलत होते.

नितेश राणे काय म्हणाले?

‘१३ ऑगस्ट २००४ मातोश्रीमध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये एका खासदारासह तीन जण उपस्थित होते. त्यात स्वतः उद्धव ठाकरे मातोश्रीवर उपस्थित होते. बैठकीत उद्धव ठाकरेंनी सांगितले की, ‘१९९२-९३ साली जशा दंगली घडल्या आणि त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आली. तशीच दंगल आपल्याला घडवायची आहे.’ त्याची प्लॅनिंग तिथे होत होती. तिथे संबंधित पदाधिकाऱ्यांनी, जे माजी सरचिटणीस आहे, त्यांना सांगितले गेले की, चर्नी रोड आणि दक्षिण मुंबईतल्या भागातील मुस्लीम फेरीवाल्यावर वस्तऱ्याने जाऊन हल्ले करायचे आणि त्यांच्यामुळे मुंबईमध्ये दंगली घडतील. मग त्या हल्ल्यानंतर दंगल करण्याची जबाबदारी आणि दंगल भडकवण्याची जबाबदारी ही स्वतः माझी असेल, हे स्वतः उद्धव ठाकरे म्हणाले. या दंगलीचा फायदा हा शिवसेनेला होईल आणि यांना मुख्यमंत्री बनता येईल, हा आदेश उद्धव ठाकरेंनी दिला होता का?’ असा सवाल नितेश राणेंनी केला.

(हेही वाचा – कैदी नंबर ८९५९, चपट्या पायाचा, पणवती असा उल्लेख करत नितेश राणेंचा संजय राऊतांवर घणाघात)

तसेच पुढे नितेश राणे म्हणाले की, ‘गेल्या ९ महिन्यांपासून महाराष्ट्रात ज्या दंगली घडतायत, अशांतता ठेवण्याचा जो प्रयत्न होतोय, याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि त्याच्या टोळीचा हात आहे का? हे गृहविभागाने तपासले पाहिजे. छत्रपती संभाजीनगर, मालवणीमध्ये घडलेल्या दंगलीत उद्धव ठाकरेंचा हात आहे का? हे गृहविभागने तपासले पाहिजे. कारण या माणसाला मुख्यमंत्री बनण्यासाठी राज्याच्या जनतेला वेठीस ठेवण्याची सवय आहे.’

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.