दिशा सालीयन प्रकरणी आक्षेपार्ह विधान करून समाज माध्यमावर बदनामी केल्याप्रकरणी नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी मालवणी पोलिसांनी राणे पिता पुत्र यांना चौकशीसाठी हजर राहण्याकरता समन्स पाठवण्यात आले आहेत. नितेश राणे यांना ३ मार्च आणि नारायण राणे यांना ४ मार्च रोजी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी समन्समध्ये म्हटले आहे.
…म्हणून राणे अडचणीत
नारायण राणे यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिशा सालीयन बाबत आक्षेपार्ह विधान करून तिची हत्या झाली असल्याचे म्हटले होते. या विधानाला नितेश राणे यांनी दुजोरा देत समाज माध्यमावर दिशा आणि तिच्या कुटुंबियांची समाजात नाहक बदनामी होत असल्याची तक्रार दिशाची आई वासंती सालीयन यांनी मालवणी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
( हेही वाचा :हवामान बदलाचा बसणार ‘फटका’! मुंबईसह ‘या’ शहरांसाठी धोक्याची घंटा )
चौकशीसाठी हजर व्हा
याप्रकरणात मालवणी पोलिसांनी मंगळवारी नारायण राणे आणि नितेश राणे यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. नारायण राणे यांना ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आणि नितेश यांना ३ मार्च सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्समध्ये म्हटले आहे.