आता नितेश राणेंकडून ‘त्या’ भाजप कार्यकर्त्यांचा सत्कार!

श्रीराम जन्मभूमी ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यावर शिवसेनेनेही जाब विचारला. त्यामुळे शिवसेनेविरोधात भाजपा युवा मोर्चाने थेट शिवसेना भवनवर धडक देऊन आंदोलन केले होते.

शिवसेना भवनवर फटकार मोर्चा काढणाऱ्या भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा शुक्रवारी, १८ जून रोजी आमदार नितेश राणे यांनी सत्कार केला. राणे नावाने शिवसेना घाबरते ‘परत समोर आले तर जोरदार उत्तर द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत’, अशी ग्वाही आमदार नितेश राणेंनी भाजपा कार्यकर्त्यांना दिली. शाल श्रीफळ आणि छत्रपती शिवरायांनी प्रतिमा देऊन भाजपा कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

श्रीराम जन्मभूमी ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यावर शिवसेनेनेही जाब विचारला. त्यामुळे शिवसेनेविरोधात भाजपा युवा मोर्चाने थेट शिवसेना भवनवर धडक देऊन आंदोलन केले होते. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री उडाली होती.

(हेही वाचा : जयंत पाटील कर्नाटकाला विश्वासात घेतील का?)

मागे न हटता भिडणाऱ्या भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी भाजपा युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजींदर तीवाना, दक्षिण मुंबई अध्यक्ष सनी सानप, दक्षिण मध्य मुंबई अध्यक्ष अजित सिंग, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष सचिन भिलारे, मुंबई कमिटी सदस्य रोहन देसाई यांच्यासाहित ४० कार्यकर्त्यांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुरुवार, १७ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत भिडणाऱ्या शिवसैनिकांचा सत्कार केला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करून सेनेला अप्रत्यक्षपणे आव्हान दिले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here