Nitesh Rane: हिंदूंच्या सणात आडवे येत असाल, तर…; नितेश राणेंनी बजावलं

94
Nitesh Rane: हिंदूंच्या सणात आडवे येत असाल, तर...; नितेश राणेंनी बजावलं
Nitesh Rane: हिंदूंच्या सणात आडवे येत असाल, तर...; नितेश राणेंनी बजावलं

हिंदू समाजाच्या सणात आडवे येत असाल तर याद राखा. हिंदू समाजाच्या सणावरच दगडफेक का होते ? मात्र, मुस्लिमांचे सण होत असताना कुठलाच वाद होत नाही. ही बाब खपवून घेतली जाणार नाही. आज जी अचलपूर (Achalpur) शहरात दहशत निर्माण झाली. ती दहशत एक दिवस नव्हे ३६५ दिवस असायला हवी. हिंदूकडे वाकड्या नजरा करुन पाहणाऱ्यांचे थोबडा ओळखू यायला नको. आम्ही कोणाच्या नांदी लागत नाही, आमच्या नांदी लागाल तर याद राखा, असा इशारा भाजपचे नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला. अचलपूर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनजागरण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यासभेत प्रमुख वक्ते भाजपचे नितेश राणे यांनी आपल्या भाषणातून जोरदार प्रहार केले.

(हेही वाचा-हिजबुल्लाह म्होरक्याच्या मृत्यूनंतर Pakistan मध्ये हिंसक निदर्शने! पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या)

सभेपूर्वी अचलपूर-परतवाडा शहरात हिंदू समाज आक्रोश रॅली व सभेचे आयोजन यशस्वीरित्या झाले. शहरातील चांदूरबाजार नाक्यावर रॅलीत सहभागी होण्यासाठी हजारो युवक मोटरसायकलवर भगवे झेंडे घेत दुपारपासून एकत्रित येत होते. भाजप आमदार नितेश राणे यांचे आगमन होताच जय श्रीराम च्या घोषणा देत ही रॅली पोलिसांच्या बंदोबस्तात दिलेल्या मार्गाने अचलपूर शहरातून प्रारंभ होत परतवाडा शहरातील जयस्तंभ चौक मार्गे परतवाडा शहरातून बाजार समितीच्या टिएमसी यार्डवरील कार्यक्रम स्थळी दाखल झाली. हजारो भगव्या पताका घेऊन उपस्थित असलेल्या हजारो युवकांनी जय श्रीरामाच्या उदघोषणा केल्या. (Nitesh Rane)

(हेही वाचा-मविआतून बाहेर पडण्याची धमक Uddhav Thackeray दाखवतील?)

याप्रसंगी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संबोधित करतांना म्हटले की, हिंदू सणासुदीच्या वेळेत केलेली मस्ती खपवून घेतली जाणार नाही. आम्हाला महाराष्ट्रात वादंग निर्माण करायचा नाही. मात्र, जिहादी विचाराचे काही लोक त्यांच्या रॅलीतून अतिरेक्यांचा जयजयकार करत असेल तर खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही नितेश राणे यांनी यासभेतून दिला. त्यांनी अकोला व अकोट येथील जल्लोषाचाही उल्लेख केला. या सभेला मोठ्या संख्येने तरुणांची उपस्थिती होती. पोलिसांच्या चोख बंदोबस्तात ही सभा व रॅली शांततेत पार पडली. या सभेला डॉ. अनिल बोंडे, शक्ती फाउंडेशनचे अॅड. प्रमोद सिंह गड्रेल, शामसिंह गड्रेल, सागर वैद्य व आदी मान्यवर उपस्थित होते. नितेश राणे यांच्या बाजार समितीमधील कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात युवक, महिला-पुरूष उपस्थित होते. परंतु संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडल्यामुळे पोलीस प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला.

शहरातून भव्य बाईक रॅली

सभेच्या पूर्वी शहरातूल अचलपूर नाका ते माल्वेशपुरा, बियाबानी मार्ग ते पोलिस स्टेशन चौक ते टक्कर चौक, खिडकीगेटपासून कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीतील सहभागी तरुण वर्गासह सहभागी नागरिक हातात भगवे झेंडे घेवून जोरदार नारेबाजी, घोषणा बाजी करीत होते. रॅलीचे समापन झाल्यानंतर धर्मसभेचे आयोजन करण्यात आले. (Nitesh Rane)

पोलिसांचा चोख बंदोबस्त

जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या नेतृत्वाखाली अचलपूर परतवाडा जुळ्या शहरासह कृषी उत्पन्न बाजार मितीच्या परिसरात सुद्धा पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. अचलपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन मेहते, परतवाडा पोलीस स्टेशन चे संदीप चव्हाण व समरसपुरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांच्यासह १५० अधिकारी, १२०० च्या वर पोलिस बंदोबस्तावर तैनात होते. (Nitesh Rane)

आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांवर कारवाई

नितेश राणे यांची बाईक रॅली फेसबुक पेजवर लाईव्ह स्ट्रीम करण्यात आली. ज्यामध्ये काही लोकांनी एका विशिष्ट समाजावर आक्षेपार्ह कमेंट केल्या होत्या. ही बाब सायबर क्राईम पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. परतवाडा पोलिस ठाण्यात – गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याला प्रत्युत्तर म्हणून जर कुणी अशा आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणात येईल, असा इशारा एका व्हीडीओच्या माध्यमातून एसपी विशाल आनंद यांनी दिला आहे. (Nitesh Rane)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.