मालवणी भाषा… सगळ्यांना ही भाषा ऐकायला खूप छान वाटते. जरी मालवणी भाषा कोणाला येत नसली तरी ती काहींना समजते. काय रे खयलो रे… असा कोणी इचारला काय ह्यो नक्की सिंधुदुर्ग जिल्ह्याचो आसा असो समज असता. याच मालवणी भाषेत बरेच सिरीयल देखील इले आणि अजूनही काही सिरीयल लोकप्रिय झालेत. मात्र आता तर राजकारणी देखील मालवणी भाषेत टीका करू लागले हत. आधीच राणेंचो आणि शिवसेनेचो छत्तीसचो आकडो. त्यात नितेश राणेंनी आज मालवणी भाषेत थेट टीका केल्यानी हा आणि ही टीका त्येंच्यानी केली हा, ती उद्धव ठाकरे यांच्याजवळ असलेल्या अनिल परब यांच्यावर..
काय हा राणेंची टीका
आमचे हरकुळचे परब… गेले त्यांच्या कलानगरच्या सायबा कडे!!
सायबाक सांगितल्यानी..
“सोमय्या पासून माका वाचवा”…
मात्र सायबाण उत्तर दिल्यान…
“तू तुझा बघून घे”!!
आता कळला ना परबांनू…आम्ही काय बोलत होतव ते!!
तुमचा स्वागत आसा…!
अशी मालवणी भाषेत भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे.
आमचे हरकुळचे परब..गेले त्यांच्या कलानगरच्या सायबा कडे!!
सायबाक सांगितल्यानी..
“सोमय्या पासून माका वाचवा” ..मात्र सायबाण उत्तर दिल्यान..
“तू तुझा बघून घे” !!आता कळला ना परबांनू..आम्ही काय बोलत होतव ते !!
तुमचा स्वागत आसा…!
— nitesh rane (@NiteshNRane) May 28, 2021
(हेही वाचाः अनिल परब यांच्या अडचणी वाढणार? आता दिल्लीचे पथक येणार मुंबईत)
नेमकं काय आहे प्रकरण?
दापोली-मुरुड समुद्र किनाऱ्यावर अनिल परब यांनी केलेल्या जमीन व्यवहाराची कागदपत्रं किरीट सोमय्या यांनी सादर केली असून, त्यातल्या तरतुदींनुसार अनिल परब यांनी घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे. तसेच, रत्नागिरीत जाऊन त्यांनी तक्रार केली आहे. दापोली येथील मुरुड समुद्र किनारी सीआरझेडचे उल्लंघन करुन 10 कोटी रुपयांचे अनधिकृत रिसॉर्ट उभारण्यात आले आहे. या रिसॉर्टचे अनौपचारिक उद्घाटनही जानेवारी 2021 मध्ये करण्यात आले. कोरोना कालावधीत हे रिसॉर्ट बांधले गेले आहे. ही शेतजमीन असतानाही कोणत्याही परवानग्या यासाठी घेतल्या गेल्या नाहीत, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः आता शिवसेनेचे अनिल अडचणीत… मंत्रिमंडळातून हाकलण्याची मागणी)
तसेच पदाचा दुरुपयोग करणार्या परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही त्यांनी राज्यपालांकडे केली आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारीही जबाबदार आहेत. तलाठी व ग्रामसेवक यांना निलंबित करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community