‘मर्द म्हणणं सोपं आहे, मैदानात येऊन दाखवा’, राणेंचे शिवसेनेला आव्हान

114

ठाकरे सरकारकडून घेण्यात आलेल्या वॉर्ड पुनर्रचनेचा निर्णय रद्द करत नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने 2017 नुसारच वॉर्ड रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला बुधवारी राज्य विधीमंडळात मंजुरू देण्यात आली.पण विरोधी पक्षांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या विधेयकाला पाठिंबा देताना भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.

नितेश राणेंनी साधला निशाणा

वॉर्ड रचनेच्या या निर्णयामुळे कोणाला किती भीती वाटतेय हे संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राला माहीत आहे. शिवाजी पार्कमध्ये उभे राहून मी मर्द आहे बोलणं सोपं आहे. पण मुंबई महापालिकेतील हे 227 वॉर्ड नजरेसमोर ठेऊन निवडणुकीला तोंड देणं अवघड आहे. त्यामुळेच आता ही फडफड होत आहे. त्यामुळे या असल्या गोष्टी बोलण्यापेक्षा सरळ मैदानात या, असे आवाहन नितेश राणे यांनी शिवसेनेला दिले आहे.

(हेही वाचाः ‘मिटकरी म्हणजे राजकारणाला लागलेला काळा डाग’, शिंदे गटाची टीका)

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

दरम्यान, वॉर्ड रचनेच्या या विधेयकाला महाराष्ट्र विधीमंडळात मंजुरी मिळाली आहे. यानुसार मुंबई महापालिकेतील वॉर्डांची संख्या 236 वरुन 227 करण्यात आली आहे. पण सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून पुढील सुनावणी होईपर्यंत याबाबत कोणताही निर्णय न घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. चार आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.